मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Politics : शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा; आमदार देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की

Amravati Politics : शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा; आमदार देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 11, 2022 01:00 PM IST

Shivaji Shikshan Sanstha Election : अमरावतीतल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत दोन गटांत मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Shivaji Shikshan Sanstha Elections In Amravati 2022
Shivaji Shikshan Sanstha Elections In Amravati 2022 (HT)

Shivaji Shikshan Sanstha Elections In Amravati 2022 : अमरावती जिल्ह्यातील प्रतिष्ठित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत मोठा राडा झाला आहे. यावेळी झालेल्या गोंधळात आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीत मतदान केंद्रावर क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाला, परंतु प्रकरण शिवीगाळ पर्यंत पोहचल्यानं मतदान केंद्रावर दोन गट एकमेकांविरोधात आमने-सामने आले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन गटात झालेल्या बाचाबाचीत आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत मतदान सुरू असताना आमदार भुयार मतदान केंद्रावर पोहचले होते. यावेळी हा वाद झाला. शिवाजी शिक्षण संस्था ही विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेचे पहिले अध्यक्ष पंजाबराव देशमुख होते. त्यामुळं या शिक्षण संस्थेला मोठं राजकीय महत्त्व आहे.

अमरावतीत आज होत असलेल्या या निवडणुकीसाठी एकूण नऊ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी आठ वाजेपासून या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सभासदांची संख्या ७७४ असल्यानं विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

IPL_Entry_Point