मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashadhi wari 2022 : बेलवडीत पार पडले पहिले अश्वरिंगण; तुकोबांचे नाव घेत वारकरी झाले दंग

Ashadhi wari 2022 : बेलवडीत पार पडले पहिले अश्वरिंगण; तुकोबांचे नाव घेत वारकरी झाले दंग

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 30, 2022 02:46 PM IST

अश्व रिंगण सोहळ््याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकºयाचे रिंगण पार पडले. यावेळी विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृध्दांचे भान हरपले.

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala

Sant Tukaram Maharaj Palkhi sohala  जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे आज पार पडला. यावेळी ‘तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंग, गेला शिणवटा सारा, मेघ झाले पांडुरंग!!नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात ,अश्व धावता रिंगण, नाचे विठू काळजात!!, अशी भावना अश्व रिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना वारकरी भाविकांच्या मनात होती.

शिण घालवणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदूंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साहाने गुरुवारी झालेल्या रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवली. यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ््याचे पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबामाऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती.

अश्व रिंगण सोहळ््याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकºयाचे रिंगण पार पडले. यावेळी विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृध्दांचे भान हरपले. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकाराम चा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. यावेळी अश्व पुढे जाताच त्याच्या चरणी असणारी रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले. तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान-थोर नाही. या भावनेने प्रत्येकजण एकमेकाच्या पाया पडत होते.

IPL_Entry_Point