मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार ACB च्या रडारवर, चौकशीसाठी बोलावले

Shiv Sena : उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार ACB च्या रडारवर, चौकशीसाठी बोलावले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 09, 2023 05:58 PM IST

ACB Notice Against Nitin Deshmukh : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार एसीबीच्या रडावर आले असून आज बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीश देशमुख यांना एसीबीने नोटीस बजावली आहे. त्यांना १७ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

राजन साळवी, वैभव नाईक व आता उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवार आले आहेत. त्यांना संपत्तीच्या चौकशीसाठी एसीबीने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये देशमुख यांना १७ जानेवारी रोजी अमरावती परिक्षेत्र कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी एसीबीकडून राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे.

एसीबीची नोटीस मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, मला एसीबीची नोटीस मिळाली असून येत्या १७ जानेवारी रोजी अमरावतीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या संपत्तीची उघड माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. नितीन देशमुख म्हणाले की, या चौकशीसाठी मी उपस्थित राहून तपास यंत्रणांना सहकार्य करणार आहे. १७ जानेवारीला आमदार नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या