मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World No Tobacco Day 2023: जागतिक तंबाखू विरोधी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

World No Tobacco Day 2023: जागतिक तंबाखू विरोधी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

May 31, 2023 07:07 AM IST

दरवर्षी ३१ मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची गरज भासू लागली, या दिवसाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात.

Health Care
Health Care (Freepik )

World No Tobacco Day 2023: तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर तसेच शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. तथापि, हे माहीत असूनही, जगभरातील मोठ्या संख्येने लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करत आहेत. लोकांमध्ये बिडी, सिगारेट, गुटखा इत्यादींच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा स्थितीत तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या हानीबाबत लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशाने जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. तंबाखू निषेध दिन केव्हा आणि का साजरा करण्याची गरज भासू लागली, या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊयात...

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे इतिहास?

खरे तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये तंबाखू निषेध दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या वर्षी म्हणजे १९८८ मध्ये पहिल्यांदा जागतिक तंबाखू विरोधी दिन एप्रिल महिन्यात साजरा करण्यात आला. मात्र, नंतर तो साजरा करण्यासाठी मे महिन्यात तारीख निश्चित करण्यात आली.

तंबाखू निषेध दिवस कधी साजरा केला जातो?

दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. १९८८ मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून तंबाखूचे सेवन थांबवण्यासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा करण्यात आला.

तंबाखूच्या सेवनामुळे आजार होण्याचा धोका

तज्ज्ञांच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. याशिवाय हृदयविकार आणि इरेक्टाइल डिसफंक्शनसारखे आजारही होऊ शकतात.

WhatsApp channel