Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
देव - मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल काय पाहिजे…?
बंड्या - पैशांनी भरलेली बॅग, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी दे, ज्यात खूप सुंदर मुली असतील.
देव - (आशीर्वाद देतो) तथास्तु
(बंड्या आता कंडक्टर आहे)
…
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला - Hello भाई काय बोलतोयस. काय सुरू आहे…?
दुसरा - काही नाही रे. मस्त आहे, काय म्हणतोस?
पहिला – अरे एक काम होतं.
दुसरा - ठीक आहे. करून घे
थोड्या वेळानं निवांत बोलू.
…
भक्त - देवा, मी तुझा गुन्हेगार आहे.
मला माफ करू नको. मला दु:ख दे… वेदना दे…
माझ्यामागे भूत सोड…
देव - काय नाटकं चालवलीस तू…
सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.
…
डॉक्टर - बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत…
बाई - काही कळतच नाहीय, यांना काय झालंय ते…?
डॉक्टर साहेब, ते पोस्टमार्टम असतं ते तरी करून बघा एकदा…!!!
(बाईंचा नवरा सध्या फरार आहे…)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या