मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Blackheads: जिद्दी ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी हे उपाय आहेत खूप प्रभावी!

Blackheads: जिद्दी ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी हे उपाय आहेत खूप प्रभावी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 26, 2023 10:16 AM IST

Skin Care: तुम्ही स्वस्त आणि प्रभावी पर्याय शोधत असाल तर स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात

 Blackheads Remover
Blackheads Remover (Freepik)

Face Mask for Blackheads: ब्लॅकहेड्सची समस्या अनेकांना जाणवते. हे जिद्दी ब्लॅकहेड्स जाता जात नाहीत. चेहऱ्यावर ते अजिबात छान दिसत नाहीत. जर हे ब्लॅकहेड्स वाढले तर चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात. याला दूर करण्यासाठी उपचाराच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, परंतु जर तुम्ही स्वस्त आणि प्रभावी पर्याय शोधत असाल तर स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जे पूर्णपणे नैसर्गिक आणि खूप प्रभावी देखील आहेत.

अंड्याचा मास्क

अंड्याचा पांढरा छिद्रे घट्ट करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामुळे ब्लॅकहेड्स तर दूर होतातच पण भविष्यात ब्लॅकहेड्स होण्याची शक्यताही कमी होते. याशिवाय यामध्ये प्रथिने आणि इतर अनेक प्रकारची खनिजे असतात, ज्यामुळे तुम्हाला सुरकुत्या मुक्त त्वचा मिळते.

'असा' फेस मास्क बनवा

अंडी फोडून त्याचा पिवळा भाग वेगळा करा.

हा पांढरा भाग चेहरा आणि मानेवर लावा.

चेहऱ्यावर तीन थर लावायचे आहेत, पण पहिला थर सुकल्यावर दुसरा आणि दुसरा सुकल्यानंतर तिसरा लावायचा आहे.

सुमारे १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

हा पॅक अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही १/२ टीस्पून लिंबाचा रस आणि १ टीस्पून मध देखील घालू शकता.

टोमॅटो मास्क

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि सायट्रिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते. टोमॅटोमध्ये असलेले ऍसिड चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करते, तर व्हिटॅमिन त्वचेचे पोषण करण्याचे काम करते.

'असा' बनवा फेस पॅक

एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्या आणि ते चांगले मॅश करा.

आता ते तुमच्या चेहऱ्यावर किंवा ब्लॅकहेड्सवर लावा आणि हलक्या हातांनी २ मिनिटे घासून घ्या.

१५ मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

ग्रीन टी मास्क

फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, ग्रीन टी ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. याशिवाय ते त्वचेला मॉइश्चरायझ करते.

'असा' फेस पॅक बनवा

ग्रीन टी पाण्यात एक तास किंवा ४५ मिनिटे भिजवून ठेवा.

यानंतर हे पाणी गाळून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

या थंड पाण्यात कापसाचा गोळा बुडवून ब्लॅकहेड्सवर लावा आणि २० मिनिटे राहू द्या.

चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग