मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makeup Tricks: प्रजासत्ताक दिनाला तिरंग्याच्या रंगाने करा मेकअप, या फॅशन हॅक्सने दिसाल सुंदर

Makeup Tricks: प्रजासत्ताक दिनाला तिरंग्याच्या रंगाने करा मेकअप, या फॅशन हॅक्सने दिसाल सुंदर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 22, 2023 10:20 PM IST

Tricolour Makeup: प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला तुमच्या लूकमध्ये ट्राय कलर जोडायचा असेल, तर आय शॅडोपासून ते लिपस्टिकपर्यंतच्या मेकअपच्या आयडिया करुन पहा. यामुळे तुम्ही उठून दिसाल.

ट्राय कलर मेकअप हॅक्स
ट्राय कलर मेकअप हॅक्स

Republic Day Makeup Hacks: देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शाळा, कार्यालयापासून घरापर्यंत लोक तिरंगा फडकवतात. जर तुम्हाला देशभक्तीच्या रंगात रंगायचे असेल तर तीच बोरिंग तिरंगा बॉर्डरची साडी नेसण्याऐवजी हे मेकअप हॅक करून पहा. डोळ्यांच्या मेकअपपासून ते हेअर कलरपर्यंत, ट्राय कलरचा समावेश करून तुम्हाला सुंदर लुक मिळेल आणि सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळल्या जातील. फक्त तुमचा मेकअप किट काढा आणि स्वतःला तिरंग्याच्या रंगात रंगवा. चला तर मग जाणून घेऊया आपण कोणत्या मेकअप हॅकबद्दल बोलत आहोत.

डोळ्यांसाठी ट्राय कलर मेकअप

या प्रजासत्ताक दिनी जर ऑफिसमध्ये तिरंग्याची अनुभूती हवी असेल तर डोळ्यांचा मेकअप स्पेशल करा. जर तुम्हाला लाऊड मेकअप करायला आवडत असेल तर आयशॅडोच्या मदतीने ट्राय कलर करा. अगदी साध्या लूकमध्येही प्रजासत्ताक दिनाची अनुभूती हवी असेल तर ग्रीन आयलायनर लावा. नंतर त्याला स्मज करा आणि सोबत विंग्ड ब्लॅक लाइनर लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केशरी किंवा पांढऱ्या रंगाचे लाइनरही लावू शकता.

नेल पॉलिशने तिरंगा बनवा

जर तुम्ही डोळ्यांच्या मेकअपच्या बाबतीत प्रो नसाल तर तुम्ही तिरंगा रंगाचे नेल पॉलिश वापरून पाहू शकता. फार कमी मुली रोज नारंगी किंवा हिरवी नेल पॉलिश लावतात. आपल्या बोटांवर हिरव्या, केशरी आणि पांढऱ्या रंगाचे नेल पॉलिश लावा. ते आकर्षक दिसेल आणि तिरंगी लुक देखील मिळेल.

ऑरेंज लिपस्टिक लावा

मेकअपच्या मदतीने तुम्हाला सुंदर आणि वेगळा लुक मिळू शकतो. ब्राईट ऑरेंज कलरची लिपस्टिक लावा. तसेच डोळ्यांवर निळा किंवा हिरवा आयलायनर वापरा. हा लूक सुंदर आणि आकर्षक लूक देईल.

अॅक्सेसरीजही असू शकतात ट्राय कलर

जर तुम्हाला तिरंगी बांगड्या आवडत असतील तर हिरव्या, केशरी आणि पांढऱ्या बांगड्या एकत्र घाला. किंवा तुम्ही बाजारातून तिरंग्याचे झुमकेही खरेदी करू शकता. जे तुम्हाला प्रजासत्ताक दिनासाठी पूर्णपणे तयार करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या