मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sattu Paratha Recipe: उष्णतेवर मात करण्यासाठी खा सत्तूचा पराठा! नोट करा रेसिपी

Sattu Paratha Recipe: उष्णतेवर मात करण्यासाठी खा सत्तूचा पराठा! नोट करा रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 22, 2023 09:35 AM IST

Summer Breakfast Recipes: सत्तू हे एक प्रकारचे पीठ आहे, ज्यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. हे चविष्ट तर असतेच त्यासोबत आरोग्यासाठी उत्तम आहे.

सत्तू पराठा
सत्तू पराठा (Freepik )

Summer Recipe: उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. उन्हाळ्यात लोक शरीराला आतून थंड ठेवणारे पदार्थ खातात. सत्तू हे यापैकीच एक आहे. हे केवळ आपल्या शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर बाहेरील उष्णतेपासून दूर ठेवते. अनेक पोषक तत्वांनी भरलेले सत्तू हे उर्जेचे पॉवरहाऊस देखील मानले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की सत्तू एक प्रकारचे पीठ आहे, ज्यामध्ये भरपूर प्रोटीन आढळते. विशेष म्हणजे सत्तूला भारतातच नाही तर परदेशातही खूप पसंत केले जाते. सत्तू पासून तुम्ही पराठा बनवू शकता. या पराठ्याची रेसिपी जाणून घ्या...

सत्तू पराठ्यासाठीचे साहित्य

सत्तू - २ कप

गव्हाचे पीठ - ३ कप

ओवा- अर्धा टीस्पून

लसूण - ५ तुकडे

कांदा - २ बारीक चिरून

थोडे आले

आमचूर - १ टीस्पून

हिरवी मिरची - तीन चिरून

लिंबू - एक चमचे रस

कोथिंबीर - एक टीस्पून चिरलेली

मीठ - चवीनुसार

तूप - दोन चमचे

तेल - अर्धी वाटी

Samosa Recipe: मुगाच्या डाळीचे सारण घालून बनवा मिनी समोसे! नोट करा रेसिपी

जाणून घ्या रेसिपी

> प्रथम गव्हाचे पीठ घेऊन मळून घ्या

> आता एका भांड्यात सत्तू घ्या आणि त्यात आले, लसूण, चिरलेली कोथिंबीर, ओवा घाला.

> या मिश्रणाला पाणी टाकून मळून घ्या.

> आता या पिठात सत्तू मसाला भरून घ्या.

> आता छान गोल पराठे लाटून घ्या.

> आता नॉन स्टिकी तव्यावर हे पराठे मध्यम आचेवर भाजून घ्या.

> तुम्ही सत्तू पराठा सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

WhatsApp channel