'या' ठिकाणी आहे भारताचा शेवटचा रस्ता, बघा नयनरम्य दृश्य दाखवणारा Viral Video
Last Road of India: भारतातील शेवटचा रस्ता कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हे एक ऑफबीट डेस्टिनेशन आहे, जिथे दिसणारे दृश्य मनाला भुरळ घालते.
भारत हा खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेला आहे. भारतात अनेक सुंदर जागा आहेत. या जागांचं वेगवेगळं वैशिष्ट्यसुद्धा आहे. असाच एक रास्ता भारतात आहे ज्याची खासियत म्हणजे तो भारतातील शेवटचा रस्ता आहे. हा रस्ता दक्षिण भारतात आहे. दक्षिण भारत आपल्या सुंदर दृश्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात. दक्षिण भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी सुंदर असण्यासोबतच इतर ठिकाणांपेक्षा खूप वेगळी मानली जातात. भारतातील शेवटचा रस्ता तामिळनाडूमध्ये आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताचा शेजारी देश श्रीलंका येथून सहज दिसतो. ऑफबीट डेस्टिनेशन असल्याने पर्यटकांना ते खूप आवडते.
ट्रेंडिंग न्यूज
काय आहे रस्त्याचे नाव?
तमिळनाडूच्या दक्षिण-पूर्वेस असलेल्या या रस्त्याचे नाव धनुषकोडी आहे. हे रामेश्वरम बेटाच्या किनाऱ्यावर वसलेले आहे आणि भारत-श्रीलंकेची जमीन सीमा म्हणून ओळखले जाते. त्याचे क्षेत्रफळ फक्त ५० यार्ड आहे आणि त्याचा पायथ्याशी वाळूचा ढीग आहे, परंतु त्याचे सौंदर्य मन मोहून टाकते. हे ठिकाण बऱ्याच काळापासून निर्जन होते, परंतु काही काळापासून पर्यटक येथे येऊ लागतात, कारण हे पर्यटकांसाठी एखाद्या ऑफबीट डेस्टिनेशन म्हणून बेस्ट आहे.
बघा व्हायरल व्हिडीओ
आहे प्रभू रामाशी संबंध
धनुषकोडीचे स्थान रामेश्वरमपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे आणि ते भगवान रामाशी संबंधित असल्याचे मानले जाते. असे म्हणतात की रामायण काळात भगवान रामाने हनुमानजींना या ठिकाणी राम सेतू बांधण्याचा आदेश दिला होता. असे मानले जाते की माता सीतेला लंकेतून मुक्त केल्यानंतर भगवान रामाने आपल्या धनुष्याच्या एका टोकाने राम सेतू तोडला, म्हणून या स्थानाला धनुषकोडी म्हणतात.
संबंधित बातम्या
विभाग