मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Neeti: तुम्हाला धनवान बनायचे असेल तर, आचार्य चाणक्याच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Neeti: तुम्हाला धनवान बनायचे असेल तर, आचार्य चाणक्याच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 15, 2022 08:59 AM IST

आज आपण आचार्य चाणक्य यांच्या धनप्राप्तीसाठीच्या कल्पनांबद्दल जाणून घेणार आहोत.

निती शास्त्र
निती शास्त्र

आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रातील श्लोकांद्वारे मनुष्याचे कर्म आणि जीवन याबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांची धोरणे जरी तुम्हाला कठोर वाटत असली तरी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जीवनात एक ना एक प्रकारे सत्य नक्कीच दाखवतात. भलेही तुम्ही त्याच्या विचारांकडे दुर्लक्ष केले, परंतु हे शब्द तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतील. आज आपण आचार्य चाणक्य यांच्या धनप्राप्तीसाठीच्या कल्पनांबद्दल जाणून घेणार आहोत.

चाणक्य नीतीनुसार जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी काही उपाय करणे देखील आवश्यक आहे. चाणक्याच्या मते, देवासाठी स्वतःच्या हातांनी हार बनवला पाहिजे. असे केल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते.

आचार्य चाणक्य म्हणतात की इतरांनी वापरलेले चंदन देवाला अर्पण करण्यासाठी वापरू नये. स्वत:च्या हाताने चंदन घोळून देवाला अर्पण केल्यास उत्तम होईल.

चाणक्य म्हणतात की इतरांनी लिहिलेल्या स्तुतीमुळे तुमच्या भावना योग्य मार्गाने देवापर्यंत पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत आराध्याप्रती तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वतः देवाची स्तुती लिहा.

आचार्य चाणक्य यांच्या मते, पैसा मिळविण्यासाठी व्यक्तीला ध्येय जाणून घेणे आवश्यक आहे. जर स्वतःच ध्येय निश्चित केले नाही तर तो यश मिळवू शकणार नाही. चाणक्य नुसार पैशाशी संबंधित कामांची माहिती इतर कोणालाही देऊ नये.

WhatsApp channel