मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rose Skin Care: उन्हाळ्यात गुलाबी ग्लो देईल गुलाब, स्किन केअरमध्ये असे वापरा

Rose Skin Care: उन्हाळ्यात गुलाबी ग्लो देईल गुलाब, स्किन केअरमध्ये असे वापरा

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 30, 2023 10:50 AM IST

Summer Skin Care Tips: गुलाबामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ३ त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबाचा वापर अवश्य करावा.

स्किन केअरमध्ये गुलाबाचा वापर
स्किन केअरमध्ये गुलाबाचा वापर

Skin Care With Rose: उन्हाळ्यात काही गोष्टी या जादूपेक्षा कमी नसतात. उन्हाळ्यात तुमची त्वचा निस्तेज होत असेल तर तुम्ही या जादुई गोष्टी त्वचेवर वापरू शकता. गुलाब ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, जी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. गुलाबामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ३ त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबाचा वापर अवश्य करावा. आज आम्ही सांगतोय तुम्ही कोण कोणत्या पद्धतीने गुलाबाचा वापर करू शकता. चला तर वाट कसली पाहत आहात, जाणून घ्या या पद्धती.

रोझ वॉटर टोनर

जर तुम्ही मेकअप करून चेहऱ्यावर गुलाबी चमक आणत असाल तर त्याऐवजी चेहऱ्यावर गुलाबाचा वापर करावा. गुलाब टोनरने तुम्हाला गुलाबी ग्लो मिळेल. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब जल वापरा. यामुळे तुम्हाला ओपन पोर्सची समस्या होणार नाही.

रोझ फेस मास्क

फेस मास्क बनवण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही गुलाबाची पावडर वापरू शकता किंवा ताजे गुलाब बारीक करून चेहऱ्याला लावू शकता. यासाठी एक चमचा दह्यात एक चमचा गुलाब पावडर मिक्स करा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

रोझ क्लींजर

चेहरा स्वच्छ करण्यासाठी डेली क्लींजर देखील खूप प्रभावी आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलाब क्लींजर देखील वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील सर्व घाण साफ होईल.

रोझ सनस्क्रीन

उन्हाळ्यात सनस्क्रीनला खूप महत्त्व आहे. हे तुम्हाला टॅनिंगपासून वाचवते. टॅनिंग टाळण्यासाठी, आपण दररोज कास्टिंग किंवा गुलाब बेस वाली सनस्क्रीन लागू करू शकता. हे तुम्हाला कव्हरेजसह एक गुलाबी ग्लो देईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel