मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  डिनरमध्ये हलकं आणि वेगळं खायचंय? ट्राय करा टेस्टी उत्तपम

डिनरमध्ये हलकं आणि वेगळं खायचंय? ट्राय करा टेस्टी उत्तपम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2023 08:47 PM IST

Dinner Ideas: जर तुम्हाला रोज भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही उत्तपम बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे, तुम्ही कोणत्याही चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता. झटपट बनवण्यासाठी पहा ही रेसिपी.

उत्तपम
उत्तपम (freepik)

Tasty Uttapam Recipe: रात्रीच्या जेवणात रोज काय बनवायचे हा मोठा प्रश्न असतो. रोज तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी हलके आणि वेगळं खायची इच्छा असेल तर तुम्ही चविष्ट उत्तपम बनवू शकता. त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर ते पटकन तयारही होते. तसे तर पारंपारिक उत्तपम हे उडीद डाळ आणि तांदळापासून बनवले जाते. पण इथे आम्ही तुम्हाला रव्यापासून झटपट उत्तपमची रेसिपी देत आहोत. पहा कसे बनवायचे.

उत्तपम बनवण्यासाठी साहित्य

- रवा

- दही

- मीठ

- मोहरी

- शिमला मिरची

- हिरवी मिरची

- कांदा

- टोमॅटो

- तेल

कसे बनवावे

उत्तपम बनवण्यासाठी तुम्ही प्रथम एका भांड्यात रवा काढा आणि नंतर त्यात दही घाला. किमान १५ मिनिटे ठेवा. यासाठी आंबट दही वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे उत्तपमला छान आंबटपणा येतो. जोपर्यंत रवा भिजत आहे तोपर्यंत सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. आता सर्व भाज्या रव्याच्या बॅटरमध्ये टाका आणि कढईत तेल गरम करा. नंतर त्यात मोहरी तडतडल्यावर ते बॅटरमध्ये टाकून मिक्स करा. यासोबतच त्यात मीठही टाका. आता उत्तपमचे पीठ तयार आहे. तवा गरम करुन त्यावर बॅटर टाकू थोडे जाडसर पसरवा. उत्तपम चांगले भाजून घ्या. नारळाच्या चटणी किंवा सांबार बरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग