मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  चहा बनवताना तुम्ही करत नाही ना ही चुक? अशा प्रकारे बनवा परफेक्ट

चहा बनवताना तुम्ही करत नाही ना ही चुक? अशा प्रकारे बनवा परफेक्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2023 06:51 PM IST

Milk Tea: काही लोक असा चहा बनवतात, ज्याच्या वासाने लोकांना इच्छा नसतानाही चहा प्यावासा वाटतो. त्याचबरोबर अनेकांच्या हातातील चहाचे शौकीन असलेल्यांनाही सहन होत नाही. येथे चांगला चहा कसा बनवायचा ते पाहा.

चहा
चहा (unsplash)

How to make Perfect Tea: लोकांना चहा बनवणे खूप सोपे वाटते. पण परफेक्ट चहा बनवणे ही एक कला आहे. चहाची चव प्रत्येक वेळी सारखी राहत नाही हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. किंवा तुम्हाला विशिष्ट दुकान किंवा व्यक्तीने बनवलेला चहा जास्त आवडतो. चहामध्ये वापरल्या जाणार्‍या गोष्टी सारख्याच असतात, पण त्या कोणत्या प्रमाणात घालायच्या, किती वेळ शिजवायच्या, या सर्व गोष्टींचा चहाच्या चवीवर परिणाम होतो. बहुतेक लोकांना असे वाटते की पाणी उकळवून त्यात आले, साखर (चवीनुसार), चहापत्ती आणि दूध घालून चहा तयार होईल. इथे तुम्ही अशाच पदार्थांनी असा चहा बनवायला शिकू शकता, ज्याचा सुगंध तुमचे मन ताजेतवाने करेल.

साहित्य

- चहापत्ती

- साखर

- लवंग

- वेलची

- आले

- दूध

- पाणी

पद्धत

चहा बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये पाणी उकळवा. जर तुम्हाला दुधाचा देसी चहा प्यायचा असेल तर जास्त पाणी घालू नका. थोडे पाणी मध्यम आचेवर उकळवा. त्यात ३-४ लवंगा आणि वेलची ठेचून घाला. तुम्ही याची पावडर देखील वापरु शकता यानंतर आले ठेचून घाला. गॅसची फ्लेम कमी करा आणि थोडा वेळ उकळू द्या. आता त्यात चहापत्ती टाका. जर तुम्हाला जास्त स्ट्राँग चहा नको असेल तर प्रति कप एक चमचा चहापत्ती घाला. आता चहाला उकळी येऊ द्या. लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी पाण्यात टाकून उकळल्या म्हणजे त्यांचा अर्क आणि चव पाण्यात येते. जर तुम्ही घाई गडबडीत मोठ्या आचेवर चहा बनवला तर या सर्व गोष्टी कच्च्या राहतील आणि तुमचा चहा गोड दुधासारखा होईल. सुमारे १० मिनिटे उकळल्यानंतर त्यात उकळलेले दूध घाला. आता दुधासह चहाचे पाणी शिजूद्या. आच मध्यम करावी. शेवटी साखर घाला. चहाला दुधासोबत चांगली उकळी येऊ द्या. चहाला उकळी आल्यावर गॅस बंद करून प्लेटने अर्धा मिनिट झाकून ठेवा. तुमचा चहा तयार आहे. जर तुम्हाला चहाचे पौष्टिक मूल्य वाढवायचे असेल तर तुम्ही त्यात तुळशीची पाने आणि दालचिनी देखील टाकू शकता.

WhatsApp channel