मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kharbooja Shake: उन्हाळ्यात कूल आणि रिफ्रेशिंग आहे खरबूज शेक, टेस्टी आहे शेफ कुणाल कपूरची ही रेसिपी

Kharbooja Shake: उन्हाळ्यात कूल आणि रिफ्रेशिंग आहे खरबूज शेक, टेस्टी आहे शेफ कुणाल कपूरची ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 23, 2023 07:55 PM IST

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी विविध ज्युस, ड्रिंक पिण्याकडे लोकांचा कल असतो. उन्हाळ्यात येणारे खरबूजचे शेक तुम्ही घरी बनवू शकता. शेफ कुणाल कपूरची मस्कमेलॉन शेकची ही रेसिपी कशी बनवायची ते जाणून घ्या.

खरबूज शेक
खरबूज शेक

Kharbooja Shake Recipe: उन्हाळा सुरू होताच लोक त्यांच्या आहारात अशा पेयांचा समावेश करण्यास सुरवात करतात, ज्याचे परिणाम थंड असतात आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करतात. आत्तापर्यंत तुम्ही अशा अनेक पेयांसह उन्हाळ्याचा आनंद घेतला असेल. पण आज आम्ही तुमच्यासोबत समर ड्रिंकची रेसिपी शेअर करणार आहे, ती केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यदायीही आहे. हे पेय प्यायल्याने तुम्हाला चव तर मिळेलच शिवाय अनेक आरोग्यदायी फायदेही होतील. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया शेफ कुणाल कपूरची मस्कमेलॉन शेक म्हणजे खरबूज शेकची ही रेसिपी कशी बनवायची. कुणालने त्याच्या इंस्टाग्रामवर ही रेसिपी शेअर केली आहे.

खरबूज शेक बनवण्यासाठी साहित्य

- अर्धा मध्यम आकाराचा खरबूज

- मूठभर पुदिन्याची पाने

- २ चमचे कंडेन्स्ड मिल्क

- थंड पाणी

- जायफळ पावडर

- बर्फाचे तुकडे

खरबूज शेक बनवण्याची पद्धत

खरबूज शेक बनवण्यासाठी प्रथम खरबूज स्वच्छ करून वरून कापून घ्या. खरबूज कापताना असे कापावे की बिया बाहेर काढण्यासाठी चमचा सहज घातला जाऊ शकतो. यानंतर बिया आणि नंतर खरबूजाचा गर काढून बाजूला ठेवा. आता ब्लेंडरमध्ये खरबूजचा गर, कंडेन्स्ड मिल्क, बर्फ, पुदिना आणि जायफळ पावडर एकत्र करा. हे सर्व नीट ब्लेंड करा. तुमचा खरबूज शेक तयार आहे. ग्लास मध्ये टाकून वरून पुदिन्याच्या पानांनी गार्निश करा आणि सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग