मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  काही चटपटीत खायची इच्छा असेल तर बनवा स्ट्रीट स्टाइल ब्रेड पकोडा

काही चटपटीत खायची इच्छा असेल तर बनवा स्ट्रीट स्टाइल ब्रेड पकोडा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Oct 25, 2022 06:21 PM IST

दिवाळीचा फराळाला ब्रेक देऊन काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ट्राय करा स्ट्रीट स्टाइल ब्रेक पकोडाची ही रेसिपी.

ब्रेड पकोडा
ब्रेड पकोडा

Street Style Tasty Bread Pakora Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत खाण्याचा विचार करत असाल तर ट्राय करा ही प्रसिद्ध स्ट्रीट फूड रेसिपी ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडाची ही रेसिपी बटाटे आणि अनेक मसाले घालून बनवली जाते. गरमा गरम ब्रेड पकोडे चहासोबत खायला खूप चविष्ट लागतात. तुम्ही हे इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तर खाऊ शकता, शिवाय सकाळी नाश्त्यात देखील खायला चांगले आहे. ब्रेड पकोड्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटले तर ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य 

- २ उकडलेले बटाटे

- १ टीस्पून जिरे

- १ टीस्पून धणे

- ४ ब्रेड स्लाइस

- २ कप बेसन

- २ टीस्पून आमचूर पावडर

- २ टीस्पून काश्मिरी लाल मिरची

- गरजेनुसार हिरवी मिरची

- १ टीस्पून ओवा

- गरजेनुसार कोथिंबीर

- १/२ इंच आले

- गरजेनुसार मीठ

स्ट्रीट स्टाईल ब्रेड पकोडा कसा बनवायचा

स्ट्रीट स्टाईल ब्रेड पकोडा बनवण्यासाठी प्रथम कढई गरम करून त्यात धणे, जिरे २ ते ३ मिनिटे भाजून घ्या आणि ग्राइंडरमध्ये ठेवून बारीक पावडर करा. आता त्याच कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले आले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगले मिक्स करा. आता त्यात लाल तिखट, आमचूर पावडर, जिरे आणि धणे पूड घालून चांगले मिक्स करा. आता त्यात चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

यानंतर बेसन, ओवा, लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ तयार करा. पीठ तयार झाल्यानंतर ५ ते ७ मिनिटे बाजूला ठेवा. तुम्हाला हवं असेल तर बेसनाच्या पिठात थोडं पाणी घालून पातळ करू शकता. पण खूप पातळ करु नका. यानंतर ब्रेड स्लाइसमध्ये उकडलेले बटाटे घालून चांगले पसरवा. त्यानंतर त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवा आणि तो चांगला दाबा. आता ब्रेडचे तुकडे बेसनाच्या पिठात बुडवून तळून घ्या. तुमचा चविष्ट स्ट्रीट स्टाइल ब्रेड पकोडा तयार आहे. गरमा गरम ब्रेड पकोडे सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या