मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri Vrat Recipe: उपवासासाठी अशा पद्धतीने बनवा साबुदाणा खिचडी, होईल मोकळी आणि मऊ

Navratri Vrat Recipe: उपवासासाठी अशा पद्धतीने बनवा साबुदाणा खिचडी, होईल मोकळी आणि मऊ

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 22, 2023 10:46 PM IST

Chaitri Navratri Fasting: उपवासात तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि जास्त वेळ भूक न लागण्यासाठी तुम्ही साबुदाणा खिचडीची ही चविष्ट रेसिपी ट्राय करु शकता.

साबुदाणा खिचडी
साबुदाणा खिचडी (HT)

Sabudana Khichdi Recipe: चैत्र नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहे. अशा स्थितीत माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मातेचे भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. उपवासात तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि जास्त वेळ भूक न लागण्यासाठी तुम्ही साबुदाणा खिचडीची ही टेस्टी रेसिपी ट्राय करु शकता. साबुदाणा खिचडी उपवासाच्या वेळी जवळजवळ प्रत्येक घरात तयार केली जाते आणि खाल्ली जाते. या रेसिपीची खासियत म्हणजे साबुदाणा खिचडी बनवायला जितकी सोपी तितकी तिची चव अप्रतिम लागते. चला जाणून घेऊया मोकळी आणि मऊ साबुदाणा खिचडी कशी बनवायची.

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य

- १ वाटी साबुदाणा

- १/२ वाटी शेंगदाणे

- १ बटाटा

- १ टीस्पून कोथिंबीर

- २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या

- १ लिंबू

- ७ ते ८ कढीपत्ता

- १ टीस्पून जिरे

- १ टीस्पून तूप

- सैंधव मीठ चवीनुसार

साबुदाण्याची खिचडी बनवण्याची सोपी पद्धत

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात २-३ तास ​​भिजत ठेवा. असे केल्याने साबुदाणा मऊ होऊन फुगतो. यानंतर एका कढईत शेंगदाणे टाका, मंद आचेवर भाजून घ्या, गॅस बंद करा आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवा. शेंगदाणे थंड झाल्यावर ते हाताने मॅश करुन त्याचे साल काढून घ्या. आता ते मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या. यानंतर बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून भाजून घ्या. यानंतर, बटाटे टाका आणि ते मऊ होईपर्यंत शिजवा. तुम्ही यात उकळलेले बटाटे सुद्धा टाकू शकता. यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा घाला आणि चांगले मिक्स करा. आता कढई झाकून साबुदाणा खिचडी ५ मिनिटे शिजवा. यानंतर खिचडीमध्ये बारीक केलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि सैंधव मीठ घालून सर्व नीट मिक्स करा. यानंतर खिचडीमध्ये लिंबाचा रस टाकून २-३ मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा. तुमची उपवासाची साबुदाणा खिचडी तयार आहे.

WhatsApp channel

विभाग