White Sauce Pasta: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा क्रीमी व्हाईट सॉस पास्ता, सोपी आहे ही रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी
Restaurant Style Recipe: वेळ कोणतीही असो पास्ता आवडीने खाल्ल्या जाते. संध्याकाळची भूक भागवण्यासाठी तुम्ही पास्ता बनवण्याचा विचार करत असाल तर ट्राय करा ही रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी.
Creamy White Sauce Pasta Recipe: संध्याकाळचा नाश्ता असो वा डिनर पास्ता खायला सगळ्यांनाच आवडते. व्हाईट सॉस पास्ता हे एक प्रसिद्ध इटालियन डिश आहे, जे बहुतेक लोकांना आवडते. हे केवळ परदेशातच नाही तर भारतातही खूप लोकप्रिय आहे. प्रत्येकाला हे आपापल्या पद्धतीने खायला आवडते. हे सहसा बेबी कॉर्न, सिमला मिरची, कांदा, मशरूम, ऑलिव्ह इत्यादी सोबत बनवले जाते. पण लोक त्यांच्या आवडीच्या गोष्टी देखील त्यात टाकतात. कधी कधी व्हाईट सॉस पास्ता खाण्याची क्रेव्हिंग होते, पण बाहेर जाता येत नाही. अशा परिस्थिती तुम्ही घरीच रेस्टॉरंटसारख्या व्हाईट सॉस पास्ताचा आस्वाद घेऊ शकता. जाणून घ्या व्हाईट सॉस पास्ताची ही सोपी रेसिपी.
ट्रेंडिंग न्यूज
व्हाईट सॉस पास्तासाठी साहित्य
- पास्ता
- दूध
- रेड चिली फ्लेक्स
- ओरिगॅनो
- कांदा
- सिमला मिरची
- स्वीट कॉर्न
- मीठ चवीनुसार
- बटर
- मैदा
- काळी मिरी
व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम पास्ता घेऊन ते उकळून घ्या. उकळल्यानंतर लगेच त्यांना थंड पाण्याने धुवा जेणेकरून ते एकत्र चिकटणार नाहीत. आता एका दुसऱ्या पॅन मध्ये सर्व भाज्या बटरमध्ये स्टिर फ्राय करून घ्या आणि बाजूला ठेवा. आता एका पॅन मध्ये बटर टाका. त्यात थोडे मैदा टाका आणि नीट हलवा. जेव्हा बटर आणि मैदा चांगले शिजेल तेव्हा त्यात थोडे थोडे दूध टाकायला सुरू करा. त्याच बरोबर दूध नीट ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दूध घट्ट होऊ लागले की त्यात भाजलेल्या भाज्या आणि उकडलेले स्वीट कॉर्न टाका. आता त्यात इतर सर्व मसाले टाका आणि चांगले शिजवा. तुमचा व्हाईट सॉस रेडी आहे. या सॉस मध्ये आता पास्ता टाका आणि नीट मिक्स करा. तुम्हाला हवे तर तुम्ही यात वरून चीज सुद्धा टाकू शकता. गरमा गरम सर्व्ह करा आणि रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी व्हाईट सॉस पास्ताचा आस्वाद घ्या.