मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Potato Bite Recipe: नाश्त्यात बनवा बटाटा बाइट्स, रविवार होईल स्पेशल; पाहा रेसिपीचा video

Potato Bite Recipe: नाश्त्यात बनवा बटाटा बाइट्स, रविवार होईल स्पेशल; पाहा रेसिपीचा video

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 26, 2023 09:40 AM IST

Breakfast Video Recipe: विकेंडला काहीतरी वेगळे खायचं असेल तर, तुम्ही नाश्तासाठी बटाटा बाइट्सची सोपी रेसिपी ट्राय करू शकता.

snacks recipes
snacks recipes (Freepik)

उकडलेल्या बटाट्याचा वापर अनेक दैनंदिन पदार्थांमध्ये सामान्य आहे. तुम्ही या बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. उकडलेल्या बटाट्याचे पराठेच नाही तर तुम्ही अनेक इंटरेस्टिंग पदार्थ बनवू शकता. उकडलेल्या बटाट्यापासून पराठ्याऐवजी पोटॅटो बाइट्स वापरून तुम्ही नाश्त्यामध्ये वेगवेगळे आणि चविष्ट स्नॅक्स सर्व्ह करू शकता. यावेळी पोटॅटो बाइट्स बनवून तुम्ही फक्त नाश्त्यात काहीतरी नवीन करून बघू शकत नाही तर काही मिनिटांत क्रिस्पी आणि तिखट स्नॅक्सचाही आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया बटाटा बाइट्सच्या सोप्या रेसिपीबद्दल, ज्याच्या मदतीने तुम्ही प्रत्येकासाठी स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता. बटाटा बाइट्सच्या रेसिपीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम यूजर @ayeshakhan_1992 ने त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे.

लागणारे साहित्य

बटाटा बाइट्स बनवण्यासाठी २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, १/२ टीस्पून चिली फ्लेक्स, १/२ टीस्पून ओरेगॅनो, २ टीस्पून कॉर्न स्टार्च, थोडे तेल आणि चवीनुसार मीठ घ्या. आता बटाटा बाइट्स बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

बटाटा बाइट्सची रेसिपी

प्रथम बटाटे किसून घ्या. आता त्यात चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, कॉर्न स्टार्च आणि मीठ घालून मिक्स करा. लक्षात ठेवा की बटाट्यामध्ये सर्व साहित्य चांगले मिसळले पाहिजे. आता बटाट्याचा छोटा गोळा घेऊन त्याला गोल गोल फिरवून टिक्कीचा आकार द्या. नंतर तळहातावर ठेवा आणि हलके दाबा. त्याचप्रमाणे बटाट्याच्या सर्व टिक्की तयार करा. आता कढईत तेल टाकून गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवा.

यानंतर कढईत बटाट्याच्या बाइट्स एक एक करून सोडा आणि मंद आचेवर तळून घ्या. बटाट्याच्या बाइट्स तळताना मधून मधून फिरवत राहा. आता ते हलके सोनेरी लाल रंगाचे झाल्यावर बटाट्याच्या बाइट्स काढून प्लेटमध्ये ठेवा. तुमची कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा बाइट्स तयार आहेत. आता नाश्त्यात टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel