मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Bhurji Recipe: नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी बनवा गरमागरम पनीर भुर्जी; सोपी आहे रेसिपी

Paneer Bhurji Recipe: नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी बनवा गरमागरम पनीर भुर्जी; सोपी आहे रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2022 03:57 PM IST

पनीर भुर्जी झटपट तयार होणारी आहे तसेच हेल्दी रेसिपीही आहे. ही भुर्जी तुम्ही मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठीही बनवू शकता.

पनीर भुर्जी
पनीर भुर्जी (Freepik )

जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणासाठी काही हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल तर पनीर भुर्जीची ही अप्रतिम रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. ही रेसिपी चविष्ट तर आहे सोयाबीतच खूप कमी वेळात बनवता येते. चपाती, पराठा असं कशासोबतही तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता. मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी ही एक बेस्ट रेसिपी आहे. चला तर मग उशीर न करता पनीर भुर्जी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

पनीर भुर्जी बनवण्यासाठी साहित्य

पनीर- २५० ग्रॅम

कांदा- १

टोमॅटो- १

लाल तिखट- १ टीस्पून

हळद- १/२ टीस्पून

हिंग - १ चिमूटभर

धने पावडर- १/२ टीस्पून

पाव भाजी मसाला - १/२ टीस्पून

शिमला मिरची - १

लसूण पेस्ट - १ टीस्पून

आले - १ इंच तुकडा

कोथिंबीर - २ चमचे

तेल - १ टीस्पून

मीठ - चवीनुसार

पनीर भुर्जी बनवण्याची पद्धत

पनीर भुर्जी बनवण्यासाठी प्रथम कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करा. आता एका भांड्यात पनीर घ्या, किसून घ्या आणि बाजूला ठेवा. यानंतर कढईत १ टेबलस्पून तेल टाका आणि ते गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा.तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि हिंग टाका आणि काही सेकंद परतून घ्या. जिरे तडतडायला लागल्यावर तेलात बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांद्याचा रंग हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर त्यात लसूण पेस्ट घाला आणि ढवळत असताना तळा. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत तळा. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आले घालून मिक्स करा. थोड्या वेळाने लाल मिरची पावडर, हळद आणि धने पावडरसह सर्व मसाले घालून मिक्स करावे. आता हे मसाले किमान १ मिनिट मंद आचेवर परतून घ्या. यानंतर बारीक चिरलेली सिमला मिरची घाला आणि भाज्या मऊ होईपर्यंत मिश्रण शिजवा. यानंतर, त्यात किसलेले पनीर टाकल्यानंतर मसाल्यामध्ये चांगले मिसळा, चवीनुसार मीठ टाकल्यानंतर, पनीर भुर्जी झाकून ठेवा आणि ३-४ मिनिटे शिजवा. यानंतर गॅस बंद करून हिरव्या कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम पनीर भुर्जी सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या