मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  फक्त हलवाच नाही तर मूग डाळची खीरही होते टेस्टी, ट्राय करा ही साउथ इंडियन रेसिपी

फक्त हलवाच नाही तर मूग डाळची खीरही होते टेस्टी, ट्राय करा ही साउथ इंडियन रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Oct 06, 2022 01:46 PM IST

Moong Dal Kheer Recipe : मूग डाळचा हलवा तर तुम्ही नेहमी खाल्ला असेल. पण कधी खीर खाल्ली आहे का? ट्राय करा हे साउथ इंडियन स्पेशल डेझर्टची रेसिपी.

मूग डाळची खीर
मूग डाळची खीर

South Indian Special Moong Dal Kheer Recipe : तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा मूग डाळचा हलवा खाल्ला असेल. पण तुम्हाला माहित आहे का की मूग डाळ खीर देखील खूप चविष्ट असते. हो, ही साउथ इंडियन डिश खायला खूप चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. मूग डाळ आधीच प्रोटीन आणि मिनरल खनिजांनी समृद्ध आहे आणि जेव्हा तुम्ही ती दुधात मिक्स करुन खीर बनवता तेव्हा तिचे पौष्टिक मूल्य दुप्पट होते. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया मूग डाळ खीर कशी बनवायची.

मूग डाळ खीर बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- १/२ कप तांदूळ

- १/४ कप मूग डाळ

- २ कप दूध

- १/२ कप गूळ

- १/२ टीस्पून वेलची पावडर

- २ टीस्पून तूप

- ३ कप पाणी

- १ टीस्पून काजू

- १ टीस्पून बदाम

- १ टीस्पून बेदाणे

- केशर गरम दुधात भिजवलेले

 

मूग डाळची खीर कशी बनवायची

मूग डाळची खीर बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करा. आता त्यात काजू आणि बदाम घालून हलके भाजून घ्या. गॅस बंद करा आणि बेदाणे घालून चांगले मिक्स करा. आता त्याच पॅनमध्ये मूग डाळ आणि तांदूळ घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून. जर तुम्हाला तांदूळ आणि मूग डाळ भाजायचे नसेल तर त्याऐवजी तुम्ही मूग डाळ आणि तांदूळ पाण्यात मिक्स करुन कुकरमध्ये ठेवा आणि मंद आचेवर २-३ शिट्ट्या करा. शिजल्यावर बाहेर काढून बाजूला ठेवा.

आता दुसर्‍या पॅनमध्ये तूप टाका आणि त्यात शिजवलेला भात आणि मूग डाळ घाला. त्यात गूळ घालून मंद आचेवर विरघळू द्या. गूळ चांगला विरघळून मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि केशर घाला. आणखी २-३ मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. आता या मिश्रणात भाजलेले काजू, बेदाणे आणि बदाम टाका. आता त्यात उकळलेले थंड केलेले दूध घाला. तुमची टेस्टी हेल्दी खीर तयार आहे. फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग