मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala French Toast Recipe: नाश्त्यासाठी बनवा मसाला फ्रेंच टोस्ट! रेसिपी बनवायलाही आहे सोपी

Masala French Toast Recipe: नाश्त्यासाठी बनवा मसाला फ्रेंच टोस्ट! रेसिपी बनवायलाही आहे सोपी

Jan 23, 2023 10:13 AM IST

Breakfast Recipe: ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे, जी तुम्ही ऑफिस, कॉलेजला जाताना नाश्त्यात खाऊ शकता.

मसाला फ्रेंच टोस्ट रेसिपी
मसाला फ्रेंच टोस्ट रेसिपी (Freepik )

नाश्त्यात तुम्ही अनेकदा फ्रेंच टोस्ट खात असाल. फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी सहसा अंडी दुधात फेटली जातात, परंतु आम्ही जी रेसिपी सांगणार आहोत ती साध्या फ्रेंच टोस्टपेक्षा थोडी वेगळी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा फ्रेंच टोस्टची रेसिपी सांगत आहोत, ज्यामध्ये अंड्यांसोबत काही मसाले, एक-दोन भाज्याही लागतात. वास्तविक, या रेसिपीचेच नाव मसाला फ्रेंच टोस्ट आहे. ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे, जी तुम्ही ऑफिस, कॉलेजला जाताना नाश्त्यात खाऊ शकता. संध्याकाळच्या चहासोबत खाण्याचाही आनंद लुटू शकता. मसाला फ्रेंच टोस्ट खूप कुरकुरीत आणि मसालेदार लागतो. मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची रेसिपी येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी साहित्य

ब्रेडचे तुकडे - ४

अंडी - २

तेल किंवा बटर

कांदा - १ लहान

टोमॅटो - १ लहान

दूध - १/२ कप

हिरवी मिरची - २

कोथिंबीरची पाने - बारीक चिरून

चाट मसाला - १/२ टीस्पून

मीठ - चवीनुसार

लाल तिखट - अर्धा टीस्पून

काळी मिरी पावडर - अर्धा टीस्पून

मसाला फ्रेंच टोस्ट कसा बनवायचा?

मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. ते एकत्र मिसळा.

सर्व ब्रेड स्लाइस त्रिकोणी आकारात कापून घ्या.

आता एका भांड्यात अंडी घालून फेटून घ्या.

आता तिखट, काळी मिरी पावडर आणि मीठ असे सर्व मसाले घालून मिक्स करा.

नंतर त्यात दूध घालून फेटून घ्या.

गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात थोडे तेल किंवा बटर घाला.

अंड्याच्या मिश्रणात एक ते दोन ब्रेडचे तुकडे बुडवून गरम पॅनमध्ये ठेवा.

दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.

आता एका प्लेटमध्ये काढा. त्याचप्रमाणे सर्व ब्रेड अंड्याच्या द्रावणात बुडवून पॅनमध्ये शिजवा.

आता या सर्व स्लाइसवर चिरलेला कांदा आणि टोमॅटोचे मिश्रण ठेवा. वर चाट मसाला टाका. वरून कोथिंबीरही टाकू शकता.

हा पौष्टिक मसाला फ्रेंच टोस्ट खाण्याचा आनंद घ्या. टोमॅटो सॉस किंवा कोथिंबीर चटणी सोबत पण सर्व्ह करू शकता.

 

WhatsApp channel
विभाग