Ram Navami 2024 Recipes: भगवान रामजन्मोत्सवानिमित्त घरी बनवा भंडारा स्टाईल रव्याचा शिरा, ट्राय करा रेसिपी-how to make bhandara style sheera on ram navami 2024 ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ram Navami 2024 Recipes: भगवान रामजन्मोत्सवानिमित्त घरी बनवा भंडारा स्टाईल रव्याचा शिरा, ट्राय करा रेसिपी

Ram Navami 2024 Recipes: भगवान रामजन्मोत्सवानिमित्त घरी बनवा भंडारा स्टाईल रव्याचा शिरा, ट्राय करा रेसिपी

Apr 17, 2024 09:05 AM IST

Sheera Recipe: काही लोकांव्हा शिरा हा हलवा चिकट किंवा खूप कडक होतो. म्हणूनच चला जाणून घेऊया रव्याचा शिरा बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.

Suji Halwa Recipe For Ram Navami 2024
Suji Halwa Recipe For Ram Navami 2024 (freepik)

How to make sheera: यंदा १७ एप्रिल रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रभू रामाची जयंती साजरी केली जाते. प्रभू रामाची घरोघरी पूजा केली जाते, नंतर त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना भोग म्हणून अर्पण केल्या जातात. प्रभू रामाचा जन्म साजरा करण्यासाठी लोक त्यांना अनेक खास आणि स्वादिष्ट पारंपारिक पदार्थ देतात. अशा वेळी तुम्हालाही प्रभू रामाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर घरी रव्याचा शिरा बनवू शकता. चला जाणून घेऊयात रेसिपी..

रव्याचा शिरा कशी बनवायची?

रव्याची शिरा तयार करण्यासाठी तुम्हाला २५० ग्रॅम रवा घ्यावा लागेल. ते गाळून स्वच्छ करा.

शिऱ्यात घालण्यासाठी रव्याएवढीच साखर घ्या, म्हणजे २५० ग्रॅम.

देशी तुपात रव्याचा शिरा बनवा, त्याला वेगळी चव आणि सुगंध येतो.

रव्याचा शिरा बनवण्यासाठी तुम्हाला सुमारे २०० ग्रॅम देशी तूप वापरावे लागेल.

सर्व प्रथम, एका कढईत रवा टाका आणि मंद आचेवर ८-१० मिनिटे तळून घ्या.

आता रव्यात अर्ध्याहून अधिक तूप घालून आणखी २-३ मिनिटे परतून घ्या.

दुसरीकडे गॅसवर पॅनमध्ये साखर आणि रव्याचे तिप्पट पाणी घालून सरबत बनवा.

तुम्हाला फक्त साखर पाण्यात विरघळेपर्यंत शिजवायची आहे आणि यावेळी वेलची पावडर घाला.

भाजलेल्या रव्यामध्ये तयार केलेले अर्धे सिरप घाला आणि रवा मिसळताना ढवळून घ्या.

उरलेले सरबत रव्यात घालून गॅसची आंच कमी करा.

रवा फुगेपर्यंत हलवा अधूनमधून ढवळत शिजवावा लागेलं.

हलवा घट्ट झाला की गॅस बंद करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हलवा घट्ट किंवा पातळ ठेवू शकता.

जर तुम्हाला केशर आवडत असेल तर सरबत करताना थोडे भिजवलेले केशर घाला.

स्वादिष्ट रव्याचा शिरा तयार आहे, तुमच्या आवडत्या ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा.

Whats_app_banner