मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Alsi Laddu Recipe: हिवाळ्यात बनवा जवसाचे लाडू, प्रत्येक दुखण्यापासून मिळेल आराम, जाणून घ्या रेसिपी

Alsi Laddu Recipe: हिवाळ्यात बनवा जवसाचे लाडू, प्रत्येक दुखण्यापासून मिळेल आराम, जाणून घ्या रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2022 10:51 AM IST

Winter Recipe: हिवाळा आला की अनेकांना थंडीमुळे हाडं दुखू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही औषधे घेण्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

जवसाचे लाडू
जवसाचे लाडू (Freepik)

खाण्यापिण्याच्या दृष्टीने हिवाळा ऋतू खूप चांगला असतो. परंतु या ऋतूतील थंडीमुळे लोकांना गुडघेदुखी, पाठदुखी किंवा मज्जातंतूच्या वेदनांसह हाडांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत सारखं औषध घेणेही हानिकारक ठरते. म्हणूनच हिवाळ्याच्या हंगामात भारतीय स्वयंपाकघरात जवस, मेथी आणि गुळाचे लाडू बनवले जातात आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोज सकाळ संध्याकाळ एक एक लाडू खाल्ल्यास हिवाळ्यात सर्दी आणि वेदनांचा त्रास होणार नाही. चला जाणून घेऊया जवसाचे लाडू बनवण्याची रेसिपी.

जवसाचे लाडूचे बनवण्यासाठी साहित्य

जवस: ५०० ग्रॅम

गूळ: ५०० ग्रॅम

तांदळाचे पीठ : १ वाटी

देशी तूप: १५० ग्रॅम

कोरडे आले: ५० ग्रॅम

काजू: ५० ग्रॅम

मनुका: ५० ग्रॅम

सुके नारळ: ५० ग्रॅम

मेथी दाणे: ५० ग्रॅम

कसे बनवायचे लाडू?

१) प्रथम जवस थोडी भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये ठेवा. नंतर मिक्सरमध्ये जवस थोडी बारीक वाटून घ्या.

२) मेथीचे दाणे हलके भाजून बारीक वाटून घ्या.

३) तसेच सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घ्या.

४) यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि त्यात देशी तूप टाकून गरम करा. तुपात तांदळाचे पीठ आणि सुंठ पूड घालून थोडा वेळ परतून घ्या.

५) यानंतर, सर्व भाजलेल्या गोष्टी पॅनमध्ये एकत्र करा आणि नंतर थंड करण्यासाठी ठेवा.

६) आता गुळाचे पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात गूळ आणि एक कप पाणी उकळून घ्या.

७) पाक झाल्यावर त्यात भाजलेले सर्व साहित्य घालून नीट मिक्स करून लाडू बनवायला सुरुवात करा.

८) पाक जास्त गरम नसावे हे लक्षात ठेवा. ते थंड होण्याची वाट पाहू नका कारण ते लाडू बनवणार नाहीत.

९) यानंतर रोज सकाळ संध्याकाळ दुधासोबत जवसाचे लाडू खावेत. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या