मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: मिल्क पावडर फेशियल करा; चेहऱ्यावर येईल दुधासारखी चमक, त्वचा दिसेल तजेलदार

Skin Care: मिल्क पावडर फेशियल करा; चेहऱ्यावर येईल दुधासारखी चमक, त्वचा दिसेल तजेलदार

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 02, 2023 01:53 PM IST

Milk Powder: हिवाळ्यात चेहऱ्याची चमक परत आणण्यासाठी तुम्ही मिल्क पावडरचा वापर करू शकता. दुधाच्या पावडरमध्ये अँटी-एजिंग आणि क्लिन्जर गुणधर्म असतात, जे त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात.

facial for glowing skin
facial for glowing skin (Freepik )

Winter Skin Care: हिवाळ्यात चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते, त्यामुळे चेहरा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य नाहीसे होते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी लोक विविध उपाय करतात. जर तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर दुधाची चमक आणि नैसर्गिक चमक आणायची असेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता.मिल्क पावडरच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर ओलावा येईल आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होईल. खरं तर, दुधाच्या पावडरमध्ये अँटी-एजिंग आणि क्लिन्जर गुणधर्म असतात, जे त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात. दुधाच्या पावडरच्या मदतीने तुम्ही फेशियल कसे करू शकता ते जाणून घ्या.

क्‍लिनजिंग

एका भांड्यात एक चमचा कच्चे दूध घ्या आणि त्यात अर्धा चमचा दूध पावडर मिसळा. आता त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर चांगली लावा. १० मिनिटांनंतर चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा. असे केल्याने, मृत त्वचा काढून टाकली जाईल आणि चेहरा अधिक चांगल्या प्रकारे टोन आणि मॉइश्चराइज होईल.

वाफ घेणे

आता चेहऱ्यावर स्टीम घेण्यासाठी कोणतेही स्टीमर वापरा किंवा मोठ्या भांड्यात उकळलेले पाण्यात टॉवेल बुडवून नंतर पिळून तो टॉवेल चेहऱ्यावर झाकून वाफ घ्या. यामुळे चेहऱ्याची छिद्रे उघडतील आणि त्वचा हायड्रेट होईल.

स्क्रबिंग आवश्यक आहे

एका भांड्यात अर्धा चमचा दूध पावडर, अर्धा चमचा तांदळाचे पीठ आणि एक ते दोन चमचे कच्चे दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. आता या घरगुती स्क्रबच्या मदतीने चेहरा आणि मान स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.

मालिश

आता एका भांड्यात एक चमचा दूध पावडर घ्या आणि त्यात थोडे मध आणि खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. आता पेस्ट खूप घट्ट झाली असेल तर त्यात गुलाबजल टाका. आता चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी १० मिनिटे मसाज करा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग