मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: उष्णता आणि उन्हामुळे डोकेदुखी होते? या पद्धतींनी मिळेल आराम

Home Remedies: उष्णता आणि उन्हामुळे डोकेदुखी होते? या पद्धतींनी मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 12, 2023 09:02 PM IST

Summer Health Care: उष्णता आणि कडक उन्हामुळे अनेक वेळा तीव्र डोकेदुखी होते. या दुखण्याला तोंड देण्यासाठी, पेनकिलर घेण्याऐवजी हे नैसर्गिक घरगुती उपाय करून पहा.

उन्हामुळे होणारी डोकेदुखी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
उन्हामुळे होणारी डोकेदुखी दूर करण्यासाठी घरगुती उपाय (unsplash)

Headache Caused by Summer Heat: उन्हाळ्याचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडताना पूर्ण तयारीनिशी निघणे आवश्यक आहे. डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घालण्यापासून ते पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्याचे नुकसान होईल. अनेक वेळा उन्हामुळे आणि उष्णतेमुळे डोकेदुखी सुरू होते. ज्याचे मुख्य कारण म्हणजे उच्च तापमान आणि डिहायड्रेशन असते. जर तुम्हालाही कडक उन्हामुळे डोकेदुखी होत असेल तर पेन किलर खाण्याऐवजी हे नैसर्गिक उपाय करून तुम्हाला आराम मिळू शकतो.

टरबूजाचा रस प्या

जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एक ग्लास टरबूजाचा रस प्यायल्याने आराम मिळेल. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे खूप तहान लागल्यावर टरबूज खाल्ल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि शरीराला थंडावा मिळतो.

लिंबू पाणी

कडक उन्हामुळे डोकेदुखी होत असेल तर लिंबू पाण्याने शरीराला थंडावा मिळतो आणि तीव्र तहान शमते. कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यात काळे मीठ आणि साखर टाकून द्रावण तयार करा. हे द्रावण प्यायल्याने तीव्र उन्हामुळे होणाऱ्या डोकेदुखीत आराम मिळतो.

लवंग

लवंग हे नैसर्गिक पेन किलर म्हणून ओळखले जाते. लवंगा तव्यावर भाजून कापडात बांधून घ्या. या पोटलीचा थोडा थोडा वेळ वास घेतल्याने कडक उन्हामुळे होणाऱ्या डोकेदुखीत आराम मिळतो.

हर्बल टी

जर उष्णतेमुळे तीव्र डोकेदुखी होत असेल तर काही हर्बल चहा या वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. लेमन टी डोकेदुखी कमी करण्यास मदत करेल.

- उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एसेंशियल ऑइलचे काही थेंब लावल्याने आराम मिळेल. पेपरमिंट ऑइल आणि लॅव्हेंडर ऑइल यांचे मिश्रण लावा.

 

- डिहायड्रेशन टाळा. कडक उन्हात बाहेर जाण्यापूर्वी पाणी पिण्याची खात्री करा. तसेच उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. काकडी, टरबूज यांसारखी फळे खाल्ल्याने डिहायड्रेशनच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel