मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  सतीश कौशिक यांचे हार्ट अटॅकने झाले निधन, धोक्याच्या काही महिन्यांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणे

सतीश कौशिक यांचे हार्ट अटॅकने झाले निधन, धोक्याच्या काही महिन्यांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 09, 2023 02:03 PM IST

Satish Kaushik Death: प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते सतिश कौशिक यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका अचानक आला असला तरी त्याचे लक्षणे फार पूर्वीपासून दिसू लागतात. अशा स्थितीत लक्षणे कोणती आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.

सतीश कौशिक
सतीश कौशिक

Symptoms of Heart Attack: आपल्या अभिनयाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्त फुलवणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी शेअर करताना त्यांचे मित्र आणि सहकारी अनुपम खेर म्हणाले की, सतीश कौशिक यांचे एनसीआरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वैद्यकीय भाषेत हृदयविकाराच्या झटक्याला एमआय म्हणजेच मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतात. जरी हृदयविकाराचा झटका अचानक येतो, परंतु रुग्णाचे हृदय दीर्घकाळ त्याचे संकेत देते. अशा स्थितीत कोणती लक्षणे आहेत, ज्यांबाबत व्यक्तीने आधीच सतर्क राहून हृदयविकाराचा धोका टाळता येतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

एनजाइना पेन

एनजाइना पेनमध्ये रुग्णाला सहसा चालताना किंवा काम करताना छातीत जडपणा जाणवू लागतो. जे काम थांबल्यावर बरा होतो. या प्रकारच्या वेदनांना एनजाइना वेदना म्हणतात. हे हृदयविकाराचे एक सामान्य लक्षण आहे, जे बहुतेक लोकांमध्ये दिसून येते.

पोस्टप्रॅन्डियल एनजाइना

पोस्टप्रॅन्डियल एनजाइना ही छातीत तीव्र वेदना आहे, जी जेवणानंतर होते. जेव्हा एखादी व्यक्ती जेवल्यानंतर लगेच चालायला लागते तेव्हा ही वेदना अनेकदा होते. असे केल्याने व्यक्तीला छातीत जळजळ होण्याबरोबरच तीव्र वेदना होऊ लागतात. या स्थितीत जेव्हा व्यक्ती थांबते आणि विश्रांती घेते तेव्हा वेदना बरे होतात. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे

एखाद्या व्यक्तीला चक्कर येणे आणि उलट्या होणे किंवा चक्कर आल्याने मळमळणे हे देखील हृदयाशी संबंधित आजाराचे लक्षण असू शकते. मात्र पोटाचे आजार, मेंदूशी संबंधित समस्या किंवा कमी साखरेमुळेही ही लक्षणे जाणवू शकतात. हृदयाच्या बाबतीत कधी कधी फक्त चक्कर येऊ शकते आणि उलट्या झाल्यासारखे वाटत नाही.

जॉ लाइनमध्ये वेदना

काही लोकांना डाव्या हाताला वेदना होतात. ही वेदना जबड्यापर्यंत जाते. काही लोकांना डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांमध्ये वेदना जाणवू शकतात, जे जबड्यापर्यंत जातात.

थकवा जाणवणे

अनेकदा काम करताना थकवा जाणवू लागतो. लोक याला शरीराची कमजोरी मानतात. पण काम करताना वारंवार थकवा जाणवणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. वास्तविक हृदयाच्या कोणत्याही नळ्यामध्ये सूज किंवा संसर्ग असतानाही अनेक वेळा असे घडते. जे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते.

खोकला आणि सूज

सामान्यतः दीर्घकाळ टिकणारा खोकला हे टीबीचे लक्षण मानले जाते. पण खोकला हे देखील हृदयविकाराचे लक्षण आहे. ही समस्या प्रत्येक हृदयरोगीमध्ये एक लक्षण म्हणून दिसेल असे नाही. पण जर एखाद्याला खोकला येत असेल आणि हात-पायांवर दीर्घकाळ सूज येत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

भरपूर घाम येणे

जर एखाद्या व्यक्तीला कोणताही शारीरिक श्रम न करता किंवा उष्णत हे काहीही नसताना भरपूर घाम येत असेल तर हे देखील हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते. कधी कधी हृदयाचे ठोके खूप वेगवान होणे किंवा खूप मंद होणे हे देखील हृदयाच्या कमकुवतपणाचे संकेत देते. हीच परिस्थिती पुन्हा पुन्हा येत असेल तर हलक्यात घेऊ नका.

टीप: तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा अनुभवल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना भेटा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग