मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kajal Apply Tricks: स्मज- फ्री काजळ लावण्यासाठी उपयुक्त आहेत या ट्रिक्स, डोळे दिसतील सुंदर

Kajal Apply Tricks: स्मज- फ्री काजळ लावण्यासाठी उपयुक्त आहेत या ट्रिक्स, डोळे दिसतील सुंदर

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 29, 2023 05:47 PM IST

Smudge Free Kajal: अनेक मुलींना सुंदर डोळ्यांसाठी काजळ लावायला आवडते. पण ते पसरण्याच्या भीतीने ते लावायला टाळतात. तुम्ही या काही ट्रिक्सने स्मज फ्री काजळ लालू शकता.

काजळ लावण्यासाठी ट्रिक्स
काजळ लावण्यासाठी ट्रिक्स

Tricks to Apply Smudge Free Kajal: डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी डोळ्यांना काजळ लावणे खूप गरजेचे आहे. पण कधी कधी हे काजळ तुमचे लुक खराब देखील करते. काजळ जवळजवळ प्रत्येक स्त्री रोज वापरते, तर अनेक स्त्रियांना स्मज फ्री काजळ लावणे कठीण जाते. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगत आहोत, ज्यामुळे काजळ स्मज फ्री बनवण्यात मदत होईल.

ट्रिक १

काजळ पेन्सिल वापरताना नेहमी बाहेरील कोपऱ्यापासून आतपर्यंत फिल करा. लहान स्ट्रोक घेण्याची खात्री करा. काजल लावताना वॉटरलाईनवर पेन्सिल दाबा, असे केल्याने काजल डार्क दिसतो आणि डोळ्यांना आकर्षक बनवण्यास मदत होते.

ट्रिक २

काजळ जास्त काळ टिकवण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे तुमची काजळ पेन्सिल एका ब्लॉटेड जेल लाइनरमध्ये बुडवा आणि नंतर ती थेट तुमच्या वॉटरलाइनवर लावा. हे इंटेन्स लूक देण्यास मदत करते.

ट्रिक ३

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या डोळ्यांत खूप पाणी येत आहे आणि तुमची काजळ पेन्सिल तुमच्या डोळ्यांना चिकटत नाही, तर ब्रशसह जेल लाइनर वापरा. दररोज लावण्यापूर्वी हे वापरून पहा, कारण ते लावल्यानंतर अनेकांचे डोळे लाल होतात. स्मज प्रूफ लाइनर लावण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

ट्रिक ४

काजळ पसरू नये म्हणून तुम्ही वॉटरलाइनच्या अगदी खाली थोडी तपकिरी किंवा काळी आयशॅडो लावा. ते बाहेरून लावायला सुरुवात करा. असे केल्याने लूक खूप छान क्रिएट होतो आणि ते काजळला पसरण्यापासून टाळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग