मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Tikka: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा केसरी पनीर टिक्का, टेस्ट अशी की सगळे विचारतील रेसिपी

Paneer Tikka: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा केसरी पनीर टिक्का, टेस्ट अशी की सगळे विचारतील रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 23, 2023 05:23 PM IST

Evening Snacks: संध्याकाळी स्नॅक्समध्ये काही तरी वेगळं खायची इच्छा असेल तर ही डिश तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ट्राय करा केसरी पनीर टिक्काची ही सोपी रेसिपी.

केसरी पनीर टिक्का
केसरी पनीर टिक्का

Kesari Paneer Tikka Recipe: जर तुम्हाला पनीर खायला आवडत असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. या रेसिपीचे नाव आहे केसरी पनीर टिक्का. केसरी पनीर टिक्का बनवण्यासाठी केशरचे काही काड्या आणि कैरी व पुदिन्याची चटणी वापरली जाते. जे टिक्काच्या इतर रेसिपीपेक्षा तिची चव वेगळी आणि चविष्ट बनवण्याचे काम करते. ही रेसिपी तुम्ही संध्याकाळी चहा किंवा कॉफीसोबत नाश्तामध्ये सर्व्ह करू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया केसरी पनीर टिक्का कसा बनवायचा.

केसरी पनीर टिक्का बनवण्यासाठी साहित्य

- १/२ किलो पनीर

- २-३ केशराच्या काड्या

- १/२ कप कैरी आणि पुदिन्याची चटणी

- ५ ग्रॅम जावित्री पेस्ट

- १ चमचा वेलची पावडर

- १-१ हिरवी आणि लाल शिमला मिरची

- १ कप घट्ट दही

- १/२ टीस्पून हळद पावडर

- ५० मिली फ्रेश क्रीम

- १ कप चीज

- चवीनुसार मीठ

केसरी पनीर टिक्का बनवण्याची पद्धत

केसरी पनीर टिक्का बनवण्यासाठी प्रथम पनीर आणि सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून त्यात मीठ घाला. पनीर आणि सिमला मिरचीमध्ये कैरी आणि पुदिन्याची चटणी मिक्स करून, दही, हळद, क्रीम, जावित्री, वेलची, किसलेले चीज आणि केशर घालून पनीर आणि सिमला मिरची चांगले कोट करा. आता हे पनीर अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर ते बाहेर काढा आणि पनीर आणि सिमला मिरची एक एक करून लाकडी शीखमध्ये टाका आणि तंदूरवर किंवा तव्यावर तेलाने भाजून घ्या. सर्व बाजूंनी हलके सोनेरी रंग आल्यावर सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सॉससोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग