मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Zee Talkies Comedy Awards 2022: 'टाईमपास ३' की 'दे धक्का २?' कोणता चित्रपट मारणार बाजी?

Zee Talkies Comedy Awards 2022: 'टाईमपास ३' की 'दे धक्का २?' कोणता चित्रपट मारणार बाजी?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 25, 2022 12:21 PM IST

Zee Talkies: यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२ साठी झी टॉकीजने तब्बल १३५ नामांकने जाहीर केली आहेत.

टाईमपास ३
टाईमपास ३ (HT)

टेलिव्हिजनच्या इतिहासात विनोदाचा सन्मान करणारा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड हा पहिला आणि एकमेव पुरस्कार सोहळा असून, यंदा झी टॉकीज या सोहळ्याचे ८ वे पर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या वर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ अतिशय मोठया स्तरावर, दणकेबाज कार्यक्रमांसोबत होणार आहे. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२ साठी झी टॉकीजने तब्बल १३५ नामांकने जाहीर केली आहेत.

झी टॉकीजचे चाहते या मेगा इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याचप्रमाणे अनेक विनोदवीर झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ ची ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीत आहेत. या अवॉर्ड्सची निवड माननीय ज्युरींद्वारे केली जाणार आहे. या अवॉर्डसाठी फिल्म ज्युरी आहेत श्री. विजय पाटकर, श्री. विद्याधर पाठारे आणि श्रीमती किशोरी शहाणे आणि नाटकासाठी ज्युरी आहेत. श्री. अहित भोरे , श्रीमती संजीवनी जाधव आणि श्री. प्रदीप पटवर्धन. ही नामांकाने चित्रपट आणि नाटकांसाठी एकूण २३ विभागांना देण्यात आली आहेत.

झी टॉकीज टीमने नुकतीच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ ची नामांकन यादी मीडियासोबत जाहीर केली. प्रत्येक श्रेणीमध्ये यंदा मजबूत स्पर्धा आहे. तसेच या वेळी पहिल्यांदाच प्रेक्षक पसंती अवॉर्ड (व्यूव्हर्स चॉईस अवॉर्ड्स), म्हणजे ऑडियन्स वोट वर आधारित विभाग, नव्याने दाखल केले आहेत.

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट चित्रपट :

१) पांडू - निर्माते झी स्टुडिओ

२) डार्लिंग - निर्माते ७ हॉर्स एंटरटेनमेंट , वि पतके फिल्म्स , कथाकार मोशन पिकचर्स

३) टाईमपास ३ - निर्माते झी स्टुडिओ

४) दे धक्का २ - एव्हीके एंटरटेनमेंट , स्काय लाईन एंटरटेनमेंट

५) लोच्या झाला रे - मुंबई मूवी स्टुडिओस , आयडियास द एंटरटेनमेंट कंपनी

६) झोंबिवली - सारेगामा

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट दिग्दर्शक :

१) विजू माने - पांडू

२) समीर आशा पाटील - डार्लिंग

३) रवी जाधव - टाईमपास ३

४) महेश मांजरेकर , सुदेश मांजरेकर - दे धक्का २

५) परितोष पेंटर - लोच्या झाला रे

६) आदित्य सरपोतदार - झोंबिवली

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट लेखन :

१) विजू माने , कुशल बद्रिके , राजेश देशपांडे , समीर चौगुले - पांडू

२) प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव - टाईमपास ३

३) महेश मांजरेकर आणि गणेश मतकरी - दे धक्का २

४) परितोष पेंटर आणि प्रसाद खांडेकर - लोच्या झाला रे

५) समीर आशा पाटील - डार्लिंग

६) महेश अय्यर, साईनाथ गांवाद, सिद्धेश पुरकर, योगेश जोशी - झोंबिवली

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेता :

१) भाऊ कदम - पांडू

२) प्रथमेश परब - टाईमपास ३

३) मकरंद अनासपुरे - दे धक्का २

४) अंकुश चौधरी - लक डाउन बी पॉसिटीव्ह

५) अमेय वाघ - झोंबिवली

६) प्रथमेश परब- डार्लिंग

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेत्री :

१) सोनाली कुलकर्णी - पांडू

२) रितिका श्रोत्री - डार्लिंग

३) ऋता दुर्गुळे - टाईमपास ३

४) वैदेही परशुरामी - लोच्या झाला रे

५) सोनाली कुलकर्णी - दिल दिमाग और बत्ती

६) वैदेही परशुरामी -झोंबिवली

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता :

१) कुशल बद्रिके - पांडू

२) आनंद इंगळे - डार्लिंग

३) ह्रिषीकेश जोशी - भिरकीट

४) सिद्धार्थ जाधव - लोच्या झाला रे

५) सिद्धार्थ जाधव - दे धक्का २

६) संजय नार्वेकर - टाईमपास ३

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री :

१) अन्विता फलटणकर -टाईमपास ३

२) रेशम टिपणीस- लोच्या झाला रे

३) प्रिया बेर्डे - लकडाउन बी पॉसिटीव्ह

४) तृप्ती खामकर - झोंबिवली

५) वंदना गुप्ते - दिल दिमाग और बत्ती

६) वनिता खरात – लकडाउन बी पॉसिटीव्ह

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट गीतकार :

१) अवधूत गुप्ते - भुरूम भुरूम- पांडू

२) क्षितिज पटवर्धन - साई तुझं लेकरू - टाईमपास ३

३) मंदार चोळकर - पुन्हा धक्का - दे धक्का २

४) मंदार चोळकर -लोच्या झाला रे टायटल ट्रॅक - लोच्या झाला रे

५) प्रशांत मडपूवार -अंगात आलया - झोंबिवली

६) अवधूत गुप्ते - दादा परत या ना - पांडू

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट पार्श्वसंगीत :

१) अनुराग गोडबोले - पांडू

२) हर्ष ,करण , आदित्य - टाईमपास ३

३) हितेश मोदक - दे धक्का २

४) चिनार खारकर आणि महेश ओगले - लोच्या झाला रे

५) अविनाश विश्वजीत - लक डाउन बी पॉसिटीव्ह

६) ए. व्ही. प्रफुलचंद्र- झोंबिवली

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट गीत :

१) भुरूम भुरूम- अवधूत गुप्ते - पांडू

२) साई तुझं लेकरू - अमितराज - टाईमपास ३

३) पुन्हा धक्का - हितेश मोदक - दे धक्का २

४) केळेवाली - अवधूत गुप्ते -पांडू

५) अंगात आलया - रोहन रोहन - झोंबिवली

६) वाघाची डरकाली - अमितराज - टाईमपास ३

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट गायक :

१)आदर्श शिंदे आणि अमितराज - साई तुझं लेकरू - टाईमपास ३

२) अवधूत गुप्ते - पुन्हा धक्का - दे धक्का २

३) अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे - दादा परत याना - पांडू

४) अवधूत गुप्ते - भुरूम भुरूम - पांडू

५) रोहन प्रधान - अंगात आलया - झोंबिवली

६) अमितराज - कोल्ड ड्रिंक - टाईमपास ३

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट गायिका :

१) वैशाली सामंत - भुरूम भुरूम - पांडू

२) वैशाली सामंत - वाघाची डरकाली -टाईमपास ३

३) वैशाली भैसने महाडे - भिंगरी -दे धक्का २

४) संपदा माने - केळेवाली - पांडू

५) शाल्मली खोलगडे - कोल्ड ड्रिंक- टाईमपास ३

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट नृत्य दिग्दर्शिका :

१) राहुल ठोंबरे आणि संजीव होवलदार - साई तुझं लेकरू -टाईमपास ३

२) विठ्ठल पाटील - केळेवाली - पांडू

३) सीमा देसाई - मेरी गो राऊंड -लोच्या झाला रे

४) राहुल ठोंबरे आणि संजीव होवलदार - कोल्ड ड्रिंक -टाईमपास ३

५) राजू व्हर्गीस - अंगात आलंया - झोंबिवली

६) विठ्ठल पाटील - भुरूम भुरूम - पांडू

 

नाटक नामांकनांवर एक नजर टाकूया .

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट नाटक :

१) हीच तर फॅमिली ची गंमत आहे - निर्माते गोपाल अलगेरी आणि सुनीता अहिरे

२) खरं खरं सांग - निर्माते बदाम राजा प्रोडक्शन

३) कुर्र्र - निर्माते प्र्ग्यास क्रिएशन मुंबई

४) आमने सामने - निर्माते नीना भागवत , संतोष काणेकर आणि महेश ओवे

५) हसता हा सावता -निर्माते मोरया थेटर्स

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट दिग्दर्शक ( नाटक ) :

१) नीरज शिरवाईकर -आमने सामने

२) प्रसाद खांडेकर - कुर्र

३) संतोष पवार - हीच तर फॅमिली ची गंमत आहे

४) संजय खापरे -डोन्ट वरी हो जायेगा

५) राजेश देशपांडे - धनंजय माने इथेच राहतात

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट संहिता ( नाटक ) :

१) नीरज शिरवाईकर -आमने सामने

२) अभिराम भडकमकर - हसता हा सावता

३) प्रसाद खांडेकर - कुर्र

४) संतोष पवार - हौस माझी पुरवा

५) शरमेश बेटकर - वाकडी तिकडी

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेता ( नाटक ) :

१) आनंद इंगळे - खरं खरं सांग

२) सागर करांडे - हीच तर फॅमिली ची गंमत आहे

३) पॅडी कांबळे -कुर्र्र

४) प्रियदर्शन जाधव - हसता हा सावता

५) अंशुमन विचारे - वाकडी तिकडी

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेत्री ( नाटक ) :

१) शलाका पवार - हीच तर फॅमिली ची गंमत आहे

२) विशाखा सुभेदार - कुर्र्र

३) नम्रता संभेराव - कुर्र्र

४) प्रिया बेर्डे - धनंजय माने इथेच राहतात

५) सुलेखा तळवलकर - खरं खरं सांग

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता ( नाटक ) :

१) संतोष पवार - सुंदरा मनामध्ये भरली

२) सूर्यकांत गोवळे - टेडे मेडे

३) अभिजीत केळकर - हौस माझी पुरवा

४) अमोल बावडेकर - हसता हा सावता

५) तेजस घाडीगावकर - वन्स मोअर तात्या

 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री ( नाटक ) :

१) पूर्णिमा केंडे -अहिरे - सारखं काहीतरी होतंय

२) श्रद्धा पोखरणकर - हसता हा सावता

३) वरदा साळुंखे - दिल धक धक करे

४) रविना भायदे - लपवा छपवी

५) स्वानंदी बेर्डे - धनंजय माने इथेच राहतात

IPL_Entry_Point

विभाग