मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: अमेरिकेतही दिसली ‘आरआरआर’ची जादू; ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकले परदेशी पोलीस!

Viral Video: अमेरिकेतही दिसली ‘आरआरआर’ची जादू; ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकले परदेशी पोलीस!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 14, 2023 10:54 AM IST

US cops dancing on Naatu Naatu: ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर लोक डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता अमेरिकन पोलीसही या गाण्यावर ठेका धरू लागले आहेत.

US cops dancing on Naatu Naatu
US cops dancing on Naatu Naatu

US cops dancing on Naatu Naatu: यंदाचा ऑस्कर पुरस्कार पटकावत ‘आरआरआर’ चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या गाण्यावर आता अनेक लोक रील्स आणि व्हिडीओ बनवत असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ अमेरिकेतील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये चक्क पोलीस ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकताना दिसले आहेत.

‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर लोक डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता अमेरिकन पोलीसही या गाण्यावर ठेका धरू लागले आहेत. ऑस्कर सोहळ्यापूर्वी नेनावत जगन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. मात्र, चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. होळीच्या दिवशी हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे दिसत आहे.

यावेळी सगळे लोक रंग आणि गुलालात रंगलेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक माणूस पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवून हुक स्टेप करत असल्याचे दिसत आहेत. तर, पोलीस देखील या गाण्याच्या आकर्षक बीट्सवर नाचताना दिसत आहेत. जगन यांनी या व्हिडीओमध्ये माहिती देताना सांगितले की, हा व्हिडीओ टेक्सासमध्ये बनवला गेला आहे. या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग