मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gadar 2: सनी आणि अमिषाची जोडी जमणार; पण ‘गदर २’ची स्टोरी काय असणार? कथेबाबत मोठा खुलासा...
Gadar 2
Gadar 2

Gadar 2: सनी आणि अमिषाची जोडी जमणार; पण ‘गदर २’ची स्टोरी काय असणार? कथेबाबत मोठा खुलासा...

27 January 2023, 12:39 ISTHarshada Bhirvandekar

Gadar 2 story: ‘गदर २’ चित्रपटाच्या निमित्ताने सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Gadar 2 story: बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा ‘गदर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे एक नवे पोस्टर नुकतेच रीलीज करण्यात आले आहे. सोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. चाहते या चित्रपटासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आता या चित्रपटाची कथा काय असणार, याबद्दल देखील प्रेक्षक कयास बांधत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आता या चित्रपटाची कथा नक्की काय कसणार आहे, हे समोर आले आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्ट नुसार, ‘गदर २’चं कथानक १९७०मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असणार आहे. या चित्रपटात तारा सिंह आणि सकीना यांचा मुलगा ‘जीते’ भारतीय सैनिकाच्या रुपात दिसणार आहे. या भूमिकेत उत्कर्ष शर्मा झळकणार आहे. ‘गदर’मध्ये तारा सिंह आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. यावेळी तो आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पाकिस्तानामध्ये शिरकाव करताना दिसणार आहे.

‘गदर’मध्ये एक प्रेमकथा पाहायला मिळाली होती, तर यावेळी ‘गदर २’मध्ये वडील-मुलाच्या नात्यातील हळवे बंध पाहायला मिळणार आहे. सनी देओलने सोशल मीडियावर 'गदर २'चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे. सनी 'गदर'मध्ये हँडपंप उखडताना दिसला होता, यावेळी तो हातात हातोडा घेऊन दिसत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सनी तारा सिंहच्या अवतारात डोळ्यात राग, हातात हातोडा आणि हिरव्या पगडीसह काळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. पोस्टर पाहूनच सनी 'गदर २' घेऊन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट २००१मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओलसोबत अमिषा पटेल आणि अमरीश पुरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता चाहते 'गदर २'चीही आतुरतेने वाट पाहत आहेत.

विभाग