मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘देशासाठी काय करू शकता?’; शाहरुख खानच्या शुभेच्छांनी वेधलं साऱ्याचं लक्ष!
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan: ‘देशासाठी काय करू शकता?’; शाहरुख खानच्या शुभेच्छांनी वेधलं साऱ्याचं लक्ष!

27 January 2023, 10:57 ISTHarshada Bhirvandekar

Shah Rukh Khan: शाहरुखच्या या व्हायरल ट्वीटनंतर चाहते देखील कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Shah Rukh Khan: प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरात एक वेगळाच आनंद सोहळा पाहायला मिळाला. या दिवशी अनेक बॉलिवूडकरांनी देखील चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सगळ्यात बॉलिवूड किंग शाहरुख खान याची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. प्रजासत्ताक दिनी शाहरुख खानने देखील आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये शाहरुख खानने सगळ्यांनाच एक प्रश्न केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रजासत्ताक दिली केलेल्या या ट्वीटमध्ये शाहरुख खान याने लिहिले की, ‘देशासाठी काय करू शकता...प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्याला आपल्या संविधानाने जे दिले आहे ते जपूया आणि देशाला आणखी एका उंचीवर घेऊन जाऊया..जय हिंद.’ शाहरुख खानच्या या हटके शुभेच्छांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात देखील शाहरुख देशासाठी लढणाऱ्या एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसला आहे.

शाहरुखच्या या ट्वीटनंतर चाहते देखील कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘आपण भारतीय नागरिक आहोत. या नात्याने आपण एकमेकांच्या प्रयत्नांचे कौतुक करून, या देशाच्या विकासात हातभार लावू शकतो. आपल्या देशासाठी हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो. म्हणून आता आम्ही पठाण बघायला चाललो आहोत. त्यात तू जी मेहनत घेतली आहेस ती आम्हाला देखील बघायची आहे. बॉयकॉट न करता आपण एकमेकांचे कौतुक करूया.’

आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘तुझं बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. स्वातंत्र्य, समता हे आपल्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत.’ शाहरुखच्या या ट्वीटवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सगळेच चाहते ‘पठाण’चं कौतुक करत आहेत. तर, काहींनी शाहरुखच्या फिटनेसची देखील वाहवा केली आहे.