मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shocking! अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये लागली आग, मुलीने मारली खिडकीतून उडी

Shocking! अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये लागली आग, मुलीने मारली खिडकीतून उडी

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 04, 2022 10:59 AM IST

अभिनेत्याने मुलाखतीमध्ये सांगितला धक्कादायक अनुभव

राकेश पॉल
राकेश पॉल (HT)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता राकेश पॉलसोबत धक्कादायक घटना घडली आहे. नुकताच अभिनेत्याच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागली होती. आगीचा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील.

राकेशने घडलेल्या घटनेविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. सकाळी १०.५०च्या सुमारास राकेश शुटिंगसाठी निघणार होता. पण तेवढ्यात अचानक त्याच्या बिल्डींगचा फायर अलार्म वाजला. बिल्डींगमधली आग पाहून तो प्रचंड घाबरला होता.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, 'मी शुटिंगसाठी निघतच होतो तेवढ्यात आमच्या मालाडमधील २८ मजली बिल्डींगचा फायर अलार्म वाजायला लागला. आम्हाला कळाले की बिल्डींगमध्ये आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे दिसत होते. सगळ्या लोकांना तातडीने बिल्डींगमधून बाहेर काढण्यात आले. पण ज्या फ्लॅटमध्ये आग लागली तेथे एक मुलगी अडकली होती. ती खिडकीच्या ग्रीलजवळ आली. काही वेळ ती तिथेच उभी होती. ती इतकी घाबरली की तिने दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. सध्या ती रुग्णालयात दाखल आहे.'

पुढे तो म्हणाला, 'हे खूच अचानक घडले. लोक प्रचंड घाबरले होते. पण सुदैवाने आग लागताच ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिक्योरिटी गार्डने फायर एक्सटिंग्विशरचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामन दल आले आणि त्यांनी आग विझवली.'

कामाविषयी बोलायचे झाले तर राकेश पॉल 'Sssshhhh.. कोई है' या मालिकेत दिसला होता. त्यानंतर २०१३मध्ये तो 'जो बीवी से प्यार करे' या मालिकेत दिसला. आता सध्या तो 'ना उम्र री सीमा हो' या मालिकेत काम करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग