मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shamshera:काय आहे चित्रपटाची कथा? कुठे झालं चित्रीकरण, रणवीरचा डबल रोल; इथे वाचा
शमशेरा
शमशेरा
24 June 2022, 20:20 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 20:20 IST
  • हा चित्रपट म्हणजे एक दमदार डाकू आणि गावागावात फिरून नृत्य दाखवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मुलीची प्रेमकहाणी देखील आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) याचा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. चित्रपटातून अभिनेता रणबीर कपूर जवळपास चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

<p>shamshera</p>
shamshera

काय आहे चित्रपटाची कथा?

मीडिया रिपोर्ट्स नुसार, 'शमशेरा' हा चित्रपट एका डाकूच्या आयुष्यावर आधारित नसून त्यांच्या संपूर्ण समाजावर आधारित आहे. चित्रपटात १८०० च्या दशकात इंग्रजांसोबत आपल्या अधिकारांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढणारा समाज दाखवण्यात आला आहे. तर रणबीर त्यांचा मुख्य आहे. हा चित्रपट म्हणजे एक दमदार डाकू आणि गावागावात फिरून नृत्य दाखवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मुलीची प्रेमकहाणी देखील आहे.

<p>ranbir kapoor and vani kapoor</p>
ranbir kapoor and vani kapoor

रणबीर दिसणार दुहेरी भूमिकेत?

चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेसोबत नायकाच्या वडिलांची भूमिका देखील साकारताना दिसू शकतो. १२ वर्षाच्या करियरमध्ये पहिल्यांदाच रणबीर अशी दुहेरी भूमिका साकारत आहे.

कुठे झालंय चित्रीकरण?

रणबीर आणि वाणी कपूरच्या या चित्रपटाचं चित्रीकरण लडाख मध्ये झालं आहे. केंद्रशासित घोषित झाल्यानंतर 'शमशेरा' हा पहिलाच चित्रपट आहे ज्याचं चित्रीकरण लडाख मध्ये झालं आहे.

कुणी किती घेतलंय मानधन?

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी रणबीरने २० कोटी, संजय दत्तने ८ कोटी , वाणी कपूरने ५ कोटी तर रोनित रॉयने ४ कोटींचं मानधन घेतलं आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग