मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शुटिंगमधून वेळ काढून सलमानने दिले राम चरणला सरप्राइज
सलमान खान
सलमान खान (HT)
27 June 2022, 10:34 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 10:34 IST
  • सध्या सोशल मीडियावर सलमानचा राम चरणच्या घरातील फोटो व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली'चे हैदराबादमध्ये चित्रीकरण करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सलमानचा मुक्काम हैदराबादमध्ये आहे. त्याने त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमान खानसोबत पूजा हेगडे, राम चरण, उपासना एकत्र दिसत आहेत. त्यांच्या भेटीचा हा फोटो राम चरण आणि उपासना कानिनेनीचा क्यूट डॉग 'राइम'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सलमान खानने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. तर पूजा हेगडेने टॉप आणि ऑफ व्हाइट जीन्स घातली आहे.
आणखी वाचा : इंटीमेट सीन शूटिंगदरम्यान...; बॉबी देओलने सांगितला ईशा गुप्तासोबतचा अनुभव

राइमच्या अकाऊंटवर हा फोटो शेअर करत 'मी एक भाग्यवान डॉग आहे. खूप प्रेम, भेट घेणे आणि मिठी मारणे' असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच काही इमोजी वापरण्यात आले आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात राम चरण, पूजा हेगडे, तेलुगू अभिनेता वेंकटेश दग्गुबती आणि जगपती बाबू दिसणार आहेत. त्यासोबतच राघव जुयाल, जस्सी गिल, शहनाज गिल आणि पलक तिवारी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग