मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तू तर लय फास्ट निघाला राव! आलियाच्या गुड न्यूजने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
आलिया भट्ट- रणबीर कपूर
आलिया भट्ट- रणबीर कपूर
27 June 2022, 13:48 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 13:48 IST
  • आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल रोजी लग्न केलं होतं. आलिया आणि रणबीर लवकरच आई वडील होणार आहेत.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आई वडील होणार आहेत. एक पोस्ट करत त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. ही बातमी वाचून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. या बातमीने चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सोशल मीडियावर चाहते आपला आनंद व्यक्त करत आहेत. आलिया आणि रणबीरच्या बाळाच्या बातमीने नेटकरी खुश झाले आहेत. मात्र अशातच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल रोजी लग्न केलं होतं. आता दोन महिन्यातच त्यांनी आनंदाची बातमी दिल्याने हे सगळं फारच घाईत होत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सोबतच काही नेटकरी तर त्यांच्या लग्नाचे महिने मोजत आहेत. तर काही मीम हे तैमूरवर आधारलेले आहेत. आता तैमूरची लाइमलाईट जाणार असं त्यात म्हंटलेलं आहे. काही मीम दीपिका आणि रणवीर यांच्यावरही आहेत. यात दीपिका रणवीरला ओरडताना दिसतेय. पाहूया असेच काही भन्नाट मीम

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग