मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant: भर रस्त्यात राखी सावंतला अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Rakhi Sawant: भर रस्त्यात राखी सावंतला अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 15, 2023 11:05 AM IST

Rakhi Sawant: राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला अश्रू अनावर झाले आहेत.

राखी सावंत
राखी सावंत (HT)

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नुकताच लग्न बंधनात अडकली आहे. लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने याबाबत माहिती दिली होती. राखीच्या लग्नाला सात महिने झाले असून, तिने लग्नानंतर आपले नाव आणि धर्म बदलल्याचे देखील समोर आले. आता राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी भर रस्त्यात रडताना दिसत आहे.

सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी पापाराझींसोबत बोलताना दिसत आहे. बोलता बोलता राखी भर रस्त्यात रडताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये राखी बोलत आहे की, 'माझे लग्न तर झाले आहे, मात्र आदिल या गोष्टीला नकार देत आहे. आता मी काय करु कुठे जाऊ. ना मला झोप येते ना मला जेवण जाते. सगळे दुःख माझ्याच नशिबात का? माझ्या मामा, मावशी सर्व कुटुंबातील लोकांना आता ही गोष्ट कळाली आहे.'

पुढे राखी म्हणाली, 'परंतु त्यांनी मला सांगितलंय माझ्या आई पर्यंत ही गोष्ट अजिबात पोहोचायला नको. सध्या त्या बेशुद्ध आहेत. परंतु त्यांना शुद्ध आल्यांनतर जर ही गोष्ट समजली, तर काय होईल. याच गोष्टीची भीती आहे.' फोटोग्राफर्सशी बोलताना राखीला अश्रू अनावर झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राखीची आई सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांना कर्करोग झाला असून ब्रेन ट्यूमर झाल्याचे समोर आले. राखीची आई या मोठ्या आजाराला झुंज देत आहेत. यापूर्वी देखील राखीच्या आईला कॅन्सरशी लढा दिला होता. आता पुन्हा त्यांना कर्करोग झाला.

IPL_Entry_Point

विभाग