मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मी याच लायक आहे! हिंदू पंचांगावरून ट्रोल झाल्यानंतर आर माधवनने मागितली माफी

मी याच लायक आहे! हिंदू पंचांगावरून ट्रोल झाल्यानंतर आर माधवनने मागितली माफी

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 27, 2022 04:17 PM IST

माधवनने इस्रोने भारतीय पंचांग पाहून मिशन मंगळ साठी रॉकेट लाँन्च केल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.

आर माधवन
आर माधवन

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आर माधवन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंट दरम्यान माधवनने एक वक्तव्य केलं होतं ज्यासाठी तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. आता त्याने ट्विट करत ट्रोलर्सची माफी मागितली आहे. माधवनने इस्रोने भारतीय पंचांग पाहून मिशन मंगळ साठी रॉकेट लाँन्च केल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. आता त्याने अतिशय विनम्रतेने आपली चूक कबुल केली आहे.

माधवनने एक ट्विट करत आपली चूक मान्य केली आणि त्याचा गैरसमज झाल्याचं सांगितलं. त्याने ट्विट करत लिहिलं, 'अलमन्सला तामिळ भाषेत पंचांग म्हटलं जातं. माझी चूक आहे. मी निष्काळजीपणे हे बोलून गेलो. पण सत्य आपण बदलू शकत नाही. मिशन मंगळ आपण फक्त दोन इंजिनाच्या मदतीने करून दाखवलं होतं. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे.' सोबतच त्याने इस्रो वैज्ञानिक नंबी नारायण यांना टॅग करत लिहिलं, विकास इंजिन एक रॉकस्टार आहे.' यासोबतच आणखी एक ट्विट करत त्याने गूगलला इंग्रजीचं तामिळ आणि हिंदीमध्ये भाषांतर करायला देखील सांगितलं.'

<p>r madhavan tweet&nbsp;</p>
r madhavan tweet&nbsp;

माधवनचा 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' १ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. माधवनने याच चित्रपटाच्या एका इव्हेंटमध्ये म्हंटल होतं की, इस्रोने भारतीय पंचांगाच्या मदतीने मार्सवर यशस्वी रॉकेट लाँन्च केलं होतं. माधवनचा हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला आणि सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग