मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  २०२० पासून निया शर्माला का मिळत नाहीये काम? म्हणते, 'भिकाऱ्यासारखी परिस्थिती...'
निया शर्मा
निया शर्मा
23 June 2022, 17:54 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 17:54 IST
  • लवकरच नियाचा एक म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे. ती सध्या त्याच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. अशातच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (nia sharma)सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नियाने 'एक हजारो मैं मेरी बेहना हैं' मधून आपल्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. टीव्ही मालिकांसोबत ती अनेक म्युजिक व्हिडीओमध्येही झळकली आहे. चाहते तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. अनेक नेटकरी तिच्या कमेंट बॉक्स मध्ये याबद्दल विचारणा करताना देखील दिसतात. मात्र नियाने सध्या तिच्याकडे कुठलंही काम नसल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याकडे कोणतंही काम नसून आपण खूप कठीण परिस्थितीतून जात असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लवकरच नियाचा एक म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे. ती सध्या त्याच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. अशातच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीत बोलताना निया म्हणाली, 'अनेक लोकांना वाटतं की मी कामातून ब्रेक घेतलाय पण असं नाहीये. आम्ही ते लोक नाही जे कामातून ब्रेक घेऊ. माझं तर तेवढं वय देखील नाही की मला ब्रेक घ्यावा लागेल. मी अजूनही एक भिखारी आहे जिला काम आणि पैसे दोन्ही हवेत. मी कधी हे म्हणू शकत नाही की मला ब्रेक हवाय. मला आयुष्यात कधीही ब्रेक घ्यायची गरज पडणार नाही.'

पुढे बोलताना निया म्हणाली, 'मी अजूनही चांगल्या प्रोजेक्टची वाट बघतेय. मला चांगल्या प्रोजेक्ट मध्ये काम करायचंय. मग मला त्यासाठी वाट पाहावी लागली तरी चालेल. हा कधीकधी यासाठी ६ महिने किंवा एक वर्ष किंवा चार वर्षांचा कालावधी देखील लागू शकतो. मला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. मला वाटतं की माझ्या करियरला ब्रेक लागलाय. मी गेल्या काही काळापासून कोणतीही ऑडिशन दिलेली नाही. जेव्हा माझ्याकडे फोन येतो तेव्हा ते पहिल्यांदा माझ्यासोबत बोलतात. पण त्यानंतर त्यांचा फोन येत नाही. ऑडिशन तर दूर राहिली. माझ्यासाठी सगळं काही थांबलंय. जेव्हा मला चांगली ऑफर मिळेल मी ती लगेच मंजूर करेन.' नियाने 'जमाई राजा', 'इष्क मे मरजावा', 'नागीन ४' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग