मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा झाला ब्रेकअप? रडतानाचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा झाला ब्रेकअप? रडतानाचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 22, 2023 08:13 AM IST

Mrunal Thakur Crying: मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन चर्चा रंगली आहे.

Mrunal Thakur
Mrunal Thakur

बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मृणाल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते. नुकताच तिने रडतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन तिचा ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे.

मृणालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रडताना दिसत आहे. या फोटोसोबत मृणाल ठाकूरने तिच्या मनातले दुख व्यक्त केले आहे. हा फोटो पाहून तिचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे.

Embed
Embed

मृणालने हा फोटो शेअर करत, 'कालचा दिवस कठीण होता, पण आज मी अधिक मजबूत, समजदार आणि आनंदी आहे, प्रत्येकाच्या कथांची अनेक पाने आहेत, परंतु प्रत्येकजण त्या मोठ्याने वाचत नाही, पण मी माझ्या कथेची पाने मोठ्याने वाचण्याचा पर्याय निवडे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटातील 'कुडिए तेरी बाइव'मध्ये दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता लवकरच तिचा 'गुमराह' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग