मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आता मनोज बाजपेयी म्हणतो, 'संपूर्ण बॉलीवूडच दाक्षिणात्य चित्रपटांना घाबरलंय'

आता मनोज बाजपेयी म्हणतो, 'संपूर्ण बॉलीवूडच दाक्षिणात्य चित्रपटांना घाबरलंय'

Payal Shekhar Naik HT Marathi
Apr 28, 2022 12:41 PM IST

बॉलिवूडमध्ये काम करत असूनही काही बॉलिवूड अभिनेते चक्क दाक्षिणात्य चित्रपटांची बाजू उचलून धरताना दिसतायत. त्यात आता बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याची भर पडली आहे.

मनोज बाजपेयी
मनोज बाजपेयी

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट यांमध्ये चुरस पाहायला मिळतेय. सोशल मीडियावरही दाक्षिणात्य चित्रपट चांगले की बॉलिवूड असा वेगळाच वाद पाहायला मिळतोय. बॉलिवूडमध्ये काम करत असूनही काही बॉलिवूड अभिनेते चक्क दाक्षिणात्य चित्रपटांची बाजू उचलून धरताना दिसतायत. त्यात आता बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याची भर पडली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोजने बॉलिवूडने आता दाक्षिणात्य चित्रपटांना घाबरलं असल्याचं म्हटलं. सोबतच बॉलिवूडने त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे असंही तो म्हणाला.

दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करत त्यांच्यामधील विशेषतः सांगत मनोज म्हणाला, 'दाक्षिणात्य चित्रपट हिंदी डब केल्यावरही प्रचंड कमाई करतायत पण तिथेच बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीये. 'केजीएफ २', आरआरआर' आणि 'पुष्पा' सारखे चित्रपट हिंदी डब केल्यावरही ३०० कोटींचा पल्ला गाठतात. पण तिथेच ';सूर्यवंशी' ला २०० कोटी कमावणं अवघड होऊन बसलं. या चित्रपटांकडून बॉलीवूडने काहीतरी शिकलं पाहिजे. ते सगळे पॅशनेट आहेत, ते प्रत्येक शॉट असा देतात जसं दुनियेचा सर्वोत्तम शॉट देत आहेत. प्रत्येक फ्रेम त्यांच्या डोक्यात आधीच फिट असते. ते दर्शकांवर काहीच थोपत नाहीत. ते प्रेक्षकांवर प्रेम करतात.'

पुढे मनोज म्हणाला, 'जर तुम्ही ''केजीएफ २', आरआरआर' आणि 'पुष्पा' पाहिलात तर त्यात प्रत्येक फ्रेम अशी चित्रित केलीये जणू जीवन मरणाची स्थिती आहे. आम्ही इथेच चूक करतो. आम्ही चित्रपटांना फक्त पैसे कमावण्याचं साधन बनवलंय. आम्ही त्यांना वाईट म्हणू शकत नाही तर आम्ही त्यांना वेगळे म्हणून मोकळे होतो. पण त्यांचे चित्रपट हे मुंबईमधील दिग्दर्शक आणि निर्मात्यांना एक शिकवण आहे की चित्रपट कसे बनवावे.'

IPL_Entry_Point

विभाग