मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jhimma 2 Box Office: 'झिम्मा २'ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, कमाई सुरुच

Jhimma 2 Box Office: 'झिम्मा २'ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, कमाई सुरुच

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 19, 2023 07:04 PM IST

Jhimma 2 Box Office Collection: पाचव्या आठवड्यातही 'झिम्मा २' हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

Jhimma 2 Box Office
Jhimma 2 Box Office

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' नुकताच प्रदर्शित झाले आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. पाचव्या यशस्वी आठवड्यातही ही 'झिम्मा २'ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा 'झिम्मा २' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की. या चित्रपटाने आता पर्यंत एकूण किती कमाई केली आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

२४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या आठवड्यात तब्बल १४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यशाचा आनंद सर्वजण घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या टीमने यापूर्वी देखील सक्सेस पार्टी केली होती.
वाचा: 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर अनिता दाते करणार 'माझ्या बायकोचा नवरा'!

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

IPL_Entry_Point