मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'ते धाडसी... ', बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांना 'या' मराठी अभिनेत्याकडून भरभरून शुभेच्छा

'ते धाडसी... ', बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांना 'या' मराठी अभिनेत्याकडून भरभरून शुभेच्छा

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 11, 2022 03:19 PM IST

marathi actor congratulatestejashwi yadav: लालू प्रसाद यांचे चिरंजीव आणि राजद पक्षाचे नेता तेजस्वी यादव यांनी नुकतीच बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एका मराठी अभिनेत्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे ट्विट व्हायरल झालं आहे.

तेजस्वी यादव
तेजस्वी यादव

tejashwi yadav take oath as deputy chief minister of bihar: गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. तसंच काहीसं चित्र बिहारमध्येही पाहायला मिळालं. बिहारच्या राजकारणात वादळ आलं आणि भाजपचं सरकार कोसळलं. नितीशकुमार यांनी आपली आपल्या जेडीयूचा भाजपला असलेला पाठिंबा काढून घेतला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत सिद्ध करून राजद आणि इतर काही अपक्ष नेत्यांसह पुन्हा सरकार स्थापनेचा दावा केला. नुसताच दावा नाही केला तर सरकार स्थापन करून मुख्य मंत्रिपदाची शपथ घेतली. आणि दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव असणारे तेजस्वी यांना कमी शिक्षणामुळे हिणवलं जात होतं. मात्र त्यांनी 'ऑपरेशन तेजस्वी' यशस्वी करत आपण राजकारणात सर्वांच्या वरचढ असल्याचं सिद्ध केलं. या सगळ्यात एका मराठमोळ्या अभिनेत्याने तेजस्वी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विट करत त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. हेमंतने ट्विट करत लिहिलं, 'राष्ट्रीय जनता दलाचे तरुण आणि धाडसी नेत्तृत्व असणारे तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा! तुमची पुढील कारकीर्द यशस्वी होवो. बिहारच्या आणि पर्यायाने आपल्या देशाच्या विकासात आपण मोलाचं योगदान द्याल अशी अपेक्षा आणि मनःपुर्वक शुभेच्छा!'

हेमंतचं हे ट्विट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या ट्विटची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. नेटकरीही यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग