मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arjun Rampal Birthday: २१व्या वर्षी थाटला होता पहिला संसार; आता 'लिव्ह इन'मध्ये राहतोय अर्जुन रामपाल

Arjun Rampal Birthday: २१व्या वर्षी थाटला होता पहिला संसार; आता 'लिव्ह इन'मध्ये राहतोय अर्जुन रामपाल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 26, 2022 09:15 AM IST

Happy Birthday Arjun Rampal: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज (२६ नोव्हेंबर) त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.

Arjun Rampal
Arjun Rampal

Happy Birthday Arjun Rampal: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज (२६ नोव्हेंबर) त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन रामपाल त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. अर्जुनचा जन्म २६ नोव्हेंबर १९७२ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. त्याचे वडील लष्करी अधिकारी होते. बालपणापासूनच अर्जुनच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. तो लहान असतानाच त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. यानंतर तो आईसोबत राहू लागला.

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्याचा ओढा मनोरंजन विश्वाकडे होता. त्याने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. या क्षेत्रात त्याने भरपूर यश मिळवले. मॉडेलिंगच्या माध्यमातूनच अर्जुनने अभिनय ईश्वत देखील पाऊन टाकले. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असताना १९९मध्ये अर्जुन रामपालला 'सोसायटी फेस ऑफ द इयर' हा किताब मिळाला होता.

मॉडेलिंग क्षेत्र गाजवल्यानंतर अर्जुनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ‘प्यार इश्क और मोहब्बत’ या चित्रपटाद्वारे त्याने अभिनय विश्वात पदार्पण केलं. अर्जुनचा हा पहिला चित्रपट २००१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अर्जुनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये तब्बल ४०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील ‘चक्रव्यूह’, ‘रॉक ऑन’, ‘इन्कार’, ‘डॅडी’, ‘आंखे’, ‘दिल है तुम्हारा’, ‘ओम शांती ओम’, ‘हाऊसफुल’ हे त्याचे चित्रपट खूप गाजले.

अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला. मॉडेलिंग क्षेत्रात असतानाच अर्जुन रामपाल ‘माजी मिस इंडिया’ सुपर मॉडेल मेहेर जेसिकाच्या प्रेमात पडला होता. १९९८मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. अर्जुन आणि मेहेर हे बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडींपैकी एक होते. या जोडीला माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. मात्र, लग्नाच्या तब्बल २१ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना देखील धक्का बसला होता. २०१९मध्ये अर्जुन आणि मेहर यांनी अखेर घटस्फोट घेतला. अर्जुन रामपाल सध्या मॉडेल ग्रॅबिएलासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन आणि गॅब्रिएला या जोडीला आता मुलगा असून, अद्याप दोघांनी लग्न केलेले नाही.

IPL_Entry_Point

विभाग