मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: गौतमी पाटीलला आजवर मिळालेले गिफ्ट पाहिलेत का? पाहा फोटो

Gautami Patil: गौतमी पाटीलला आजवर मिळालेले गिफ्ट पाहिलेत का? पाहा फोटो

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 30, 2023 11:31 AM IST

Gautami Patil Gifts: गौतमी पाटीलने आपल्या नृत्य कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या चाहत्यांनी देखील तिला गिफ्ट पाठवले आहेत.

Gautami Patil
Gautami Patil

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. तिच्या कार्यक्रमाला तर तरुणाईचा अक्षरश: धुडगूस पाहायला मिळतो. गौतमी पाटीलकडून अश्लील नृत्य होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. मात्र गौतमी याकडे दुर्लक्ष करताना दिसते. गौतमीचा चाहता वर्गपण तितकाच मोठा आहे. तुम्हाला माहितीये का गौतमीला आजवर अनेक गिफ्ट्स भेटले आहेत. तिने स्वत: सोशल मीडियावर गिफ्ट्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.

गौतमी पाटीलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांनी पाठवलेले गिफ्ट्स दाखवले आहेत. तसेच चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. या पोस्टवर सुद्धा काहींनी मी तुझ्यासाठी फोटो,चित्र नाही पण कविता करू शकतो, तुझ्यावर निबंध लिहू शकतो असे म्हणत कमेंट्स केल्या आहेत.
वाचा: आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग