मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gauri Khan: प्रियांका चोप्राला कॉपी केले?; ड्रेसमुळे गौरी खान झाली ट्रोल

Gauri Khan: प्रियांका चोप्राला कॉपी केले?; ड्रेसमुळे गौरी खान झाली ट्रोल

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 06, 2022 09:31 PM IST

Gauri Khan: नेटकऱ्यांनी गौरी खानच्या ड्रेसची तुलना ही प्रियांका चोप्राच्या ड्रेसशी केली आहे.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा (HT)

सेलिब्रिटी ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्राने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने सोमवारी रात्री पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, गौरी खानच्या एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले. पण गौरीने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

गौरीने मनिष मल्होत्राच्या पार्टीसाठी खास काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. ऑस्ट्रेलियन ड्रेस डिझायनर क्रिस्टोफर इसबेरने डिझाइन केलेला हा ड्रेस परिधान केला होता. पण नेटकऱ्यांनी गौरीच्या या ड्रेसची तुलना ही प्रियांका चोप्राच्या ड्रेसशी केली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौरी खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'प्रियांकाने असा ड्रेस परिधान केला होता म्हणून हिने देखील घातला आहे' कमेंट करत असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'प्रियांका चोप्राची कॉपी केली का?' असे म्हणत गौरीला सुनावले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने ऑस्ट्रेलियन ड्रेस डिझायनर क्रिस्टोफर इसबेरने डिझाइन केला होता. प्रियांकाचा हा पांढरा ड्रेस आणि गौरीचा काळ्या रंगाचा ड्रेस जवळपास सारखाच आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी गौरीला ट्रोल केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग