मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'गाथा नवनाथांची' या मालिकेला १ वर्ष पूर्ण!
गाथा नवनाथांची
गाथा नवनाथांची (HT)
24 June 2022, 15:47 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 15:47 IST
  • मालिकेत आता नाथांचे वेगवगळे चमत्कार बघायला मिळत असून यापुढे देखील नवीन नाथांचा जन्म, नाथांचा मानव कल्याणासाठीचा प्रवास दिसेल.

सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात रसात तल्लीन केलंय. नाथ संप्रदाय आणि त्याविषयी माहिती प्रेक्षकांना या मालिकेच्या माध्यमातून मिळते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसारख्या नवनाथांच्या कथा प्रेक्षकांना समजताय. या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले असून मालिकेने प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच खूप, माहिती देखील दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संतोष अयाचित दिग्दर्शित या मालिकेने बघता बघता एका वर्षाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' ही एक वर्षाचा टप्पा पार करणारी पहिली मालिका आहे. एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आले. मालिकेतील कलाकार, निर्माते दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम यावेळेस उपस्थित होती. मालिकेत आता नाथांचे वेगवगळे चमत्कार बघायला मिळत असून यापुढे देखील नवीन नाथांचा जन्म, नाथांचा मानव कल्याणासाठीचा प्रवास दिसेल.

नाथ संप्रदायाची परंपरा आणि माहिती या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळते आहे. लवकरच प्रेक्षकांना पुढील नाथांचा जन्म बघायला मिळेल. मालिकेत पुढे कोणते चमत्कार दिसणार, नाथ अशुभ शक्तींचा कसा नाश करणार हे बघण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग