मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Athang: पहिल्याच दिवशी 'अथांग'ने केला रेकॉर्ड; ठरली सर्वाधिक पाहिली गेलेली वेबसीरिज!

Athang: पहिल्याच दिवशी 'अथांग'ने केला रेकॉर्ड; ठरली सर्वाधिक पाहिली गेलेली वेबसीरिज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 28, 2022 09:36 AM IST

आतापर्यंतचे सगळे रेकॅार्ड मोडत, ठरली सर्वाधिक पाहिलेली वेबसीरिज.

वेबसीरिज
वेबसीरिज

Athang: गेल्या अनेक दिवसांपासून ‘अथांग’ या मराठी वेब सीरिजची चर्चा पाहायला मिळत आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर विषयावर आधारित ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘अथांग’ ही सीरिज रिलीज होताच तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या सीरिजने प्रदर्शित होताच आता नवा रेकॉर्ड बनवला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतकं रेकॅार्ड ब्रेकिंग यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेबसीरिज ठरली आहे. सध्या प्रेक्षकांकडून या वेब सीरिजचं कौतुक होताना दिसत आहे.

जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' ही वेब सीरिज प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. ही नवी कोरी सीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या वेब सीरिजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या रहस्यमय वाड्याचे दरवाजे आता उघडले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतकं रेकॅार्ड ब्रेकिंग यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेब सीरिज ठरली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी ‘अथांग’ ही वेब सीरिज पाहिली आहे.

‘अथांग’सभ्य ट्रेलरमधून निसर्गयरम्य कोकण, तिथला रहस्यमय वाडा आणि त्या वाड्यात दडलेली अनेक गुपितं आणि यात आणखी उत्कंठा वाढवणारा शेवटचा प्रश्न, अशी या गूढ कथेची झलक पाहायला मिळाली होती. या सीरिजची कथा सरदेशमुखांचं कुटुंबाचा आणि त्यांच्या रहस्यमयी वाड्याभोवती फिरत आहे. या वाड्यातील गूढ हळूहळू उडगडत असतानाच प्रेक्षकांना आता पुढील भागांची उत्सुकता लागून राहिली आहे.

‘अथांग’ या वेब सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मनोरंजन विश्वात पाऊल टाकलं आहे. या सीरिजला मिळणारा प्रतिसाद पाहून तेजस्विनी पंडित म्हणते की, ‘आज माझ्या मनात काय भावना आहेत, त्या मी शब्दांत व्यक्त करूच शकत नाही. निर्माती म्हणून हा माझा पहिलाच प्रोजेक्ट, त्यामुळे हा माझ्यासाठी सुखावणारा क्षण आहे. मात्र याचे सारे श्रेय ‘अथांग’च्या संपूर्ण टीमला जाते. यामागे सगळ्यांचीच मेहनत आहे. प्रेक्षकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आता पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.’

'अथांग' या वेब सीरिजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी-सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या