बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून अमिताभ बच्चन हे ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अमिताभ बच्चन यांनी ३ जून १९७३ साली जया बच्चन यांच्याशी लग्न केले. पण जया बच्चनशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील पॉवर कपल आहे. ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन प्रेक्षकांना ही जोडी आवडते. अनेक ठिकाणी दोघे एकत्र असतात. मात्र लग्नापूर्वी अमिताभ यांनी एक अट ठेवली होती. स्वत: जया बच्चन यांनी एका पॉडकास्टच्या वेळी खुलासा केला होता.
वाचा: करीना कपूरने केली उर्फी जावेदच्या फॅशनची प्रशंसा, म्हणाली...
'सुरुवातीला आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यावेळी माझ्या कामाशी संबंधीत सगळ्या कमिटमेंट पूर्ण होत होत्या. त्यावेळी अमिताभ यांनी मला काम करत रहा असे सांगितले होते. माझ्या पत्नीने ९ ते ५ काम करावे अशी भावना होती बिग बींच्या मनात' असे जया बच्चन म्हणाल्या.
अमिताभ यांनी जयाला प्रोजेक्ट निवडण्यात आणि योग्य व्यक्तींसोबत काम करण्यास मदत केली. सर्वात आधी त्या दोघांचे लग्न जून महिन्यात होणार होते. मात्र जंजिर चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कुटुंबीयांनी जर एकत्र फिरायला जायचं तर लग्न करावे लागेल ही अट घातली. त्यानंतर त्यांना ऑक्टोबर महिन्यात लग्न करावे लागले.
संबंधित बातम्या