मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Parag Kansara: राजू श्रीवास्तव यांच्या पाठोपाठ आणखी एका कॉमेडियनचे निधन

Parag Kansara: राजू श्रीवास्तव यांच्या पाठोपाठ आणखी एका कॉमेडियनचे निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 06, 2022 09:19 AM IST

Parag Kansara Death: ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीझनमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेल्या विनोदवीर पराग कंसारा यांचे निधन झाले आहे.

पराग कंसारा
पराग कंसारा (HT)

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यापाठोपाठ आता आणखी एका कॉमेडियनचे निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीझनमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेल्या विनोदवीर पराग कंसारा यांचे निधन झाले आहे. पराग यांचे मित्र विनोदवीर सुनील पाल यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुनील पाल यांनी दु:खद बातमी दिली आहे.

सुनीलने व्हिडीओमध्ये, "नमस्कार आणखी एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे आणि तीही कॉमेडी विश्वातून. 'लाफ्टर चॅलेंज' या शोमधील आमचे मित्र पराग कंसारा यांचे निधन झाले आहे. 'उलटा सोच' अस म्हणत जे सगळ्यांना उलटा विचार करण्यास सांगून खळखळून हसवत होते तेच परत कंसारा आज आपल्याला सोडून गेले आहेत" असे म्हटले आहे.

पुढे तो म्हणाला, 'लाफ्टर चॅलेंजमधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी हजारो स्टँडअप कॉमेडीचे लाईव्ह शो केले होते. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीझनमध्ये पराग कंसारा स्पर्धक म्हणून आले होते. आज ते आपल्याला सोडून गेले आहेत.'

IPL_Entry_Point